भंडारा - जिल्ह्यच्या तुमसर तालुक्यातील देव्हाडा येथील एक पोल्ट्रीफार्म वैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडल्याने ३५०० हून अधिक कोंबड्याना जलसमाधी मिळाली. जवळपास साडेतीन लाखांचा नुकसान झाले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने पोल्ट्री मालकावर मोठे संकट ओढविले आहे.जिल्ह्यात सुरु असलेला संततधार पाऊस आणि मध्य प्रदेशातील धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा अधिक भरून वाहत असल्याने त्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे आणि मध्यप्रदेश मध्ये झालेल्या पावसामुळे मध्ये प्रदेशातून बावनथडी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने यावर्षी पहिल्यांदाच बावनथडी धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाचे 4 दार उघडण्यात आले. धरणाचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीला उफान आले त्यामुळे नदी काठावरील सखल भागात पाणी शिरले आहे.
तुमसर तालुक्यतील देव्हाडा येथे गोविंद बोन्द्रे व त्याच्या सहकारी मित्राने त्यांच्या शेतात पोल्ट्रीफार्म उभारले होते. हे वैनगंगा नदी काठाजवळ आहे. नदीचा पाणी स्तर वाढल्याने गोविंद त्याच्या मित्रांसह पोल्ट्रीफार्मवर आल्यावर त्याच्या डोळ्यासमोर असलेले दृश्य बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. पोल्ट्रीफार्म पुराच्या पाण्यात अर्ध्यापेक्षा जास्त बुडाले त्यामुळे जवळपास ३५०० कोंबड्यांचा नाका तोंडात पाणी जात गुदमरून मृत्यू झाला. हजारो कोंबडया पाण्यावर सर्वत्र तरंगत होते. नेमके काय करावे हे त्यांना कळत नोव्हते. शेवटी त्यांनी पोल्ट्रीफार्ममधील सर्व कोंबड्या बाहेर काढून त्यांना पाण्याच्या प्रवाहात सोडल्या.
कोरोना मुळे यावर्षी पोल्ट्रीफार्म व्यवसाय पहिलेच तोट्यात गेला होता. त्यात आता पुरामुळे या पोल्ट्रीफार्म मालकांचे साडेतीन लाखांचा मोठे नुकसान झाल्याने शासनाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या मालकाने केली आहे.