भंडारा - जिल्ह्यातील दोन खेळाडूंना वेगवेगळ्या खेळासाठी मानाचा छत्रपती पुरस्कार मिळाला आहे. सायकलिंग स्पर्धेसाठी अश्विन पाटील आणि आट्यापाट्या खेळासाठी प्रिया गोमासे हिला छत्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र क्रीडा विभागामार्फत दरवर्षी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो.
यावर्षी ४८ क्रीडापट्टूंना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन क्रीडापट्टूंचा सहभाग आहे. शहरातील प्रिया गोमासे व तुमसर येथील अश्विन पाटील यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. अश्विन पाटील यांनी सायकलिंगमध्ये अनेक पदक पटकाविले आहे. तर, प्रिया गोमासे या क्रीडापट्टूनी आट्यापाट्या या खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे याची दखल राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने घेतली असून २२ फेब्रुवारीला मुंबईला या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
शिवछत्रपती पुरस्कार मिळणार असल्याने क्रीडापट्टू व त्यांच्या परिवारांना एक सुखद धक्का मिळाला असल्याचे म्हटले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यावर मला बराच वेळ स्वतःवर विश्वास बसेना. माझे कुटुंब, माझे प्रशिक्षक यांनी दिलेल्या योग्य मार्गदर्शनामुळे मला हे यश मिळविता आले, असे प्रिया गोमासे हिने सांगितले. तर, अश्विन याने सुरवातीला तुमसरमध्ये मिळालेल्या खेळाच्या सरावामुळे पुढे क्रीडा प्रबोधिनी पुणेमध्ये जाऊन जो सराव केला. त्या जोरावर त्याने आतापर्यंत 6 सुवर्ण पदके जिंकली आहेत. मी क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्रासाठी मोठे काम करू शकलो आणि त्याचे पारितोषिक म्हणून सर्वात मोठा पुरस्कार मिळाल्याची प्रतिक्रिया अश्विन याने दिली. सध्या अश्विन या खेळाच्या माध्यमातून रेल्वे मध्ये नोकारीवर आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याने नक्कीच भंडारा जिल्ह्याचा या दोन खेळाडूंनी नाव लौकिक केला असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-भाजप नगराध्यक्ष, नगरसेवकांनी एकमेकांवर लावले भ्रष्टाचाराचे आरोप