ETV Bharat / state

Bhandara Flood भंडारा शहराला पुराचा वेढा, 180 कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित - भंडाऱ्यात अनेक घरात पुराचे पाणी शिरले

भंडारा शहरालगत असलेल्या टाकली- खमाटा येथे पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर मुख्य राज्यमार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, खमाटा, कपिलनगर, गणेश नगरी, गणेशपुर, भोजपुर आदि शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना स्थलांतरित केले आहे. तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल 150 कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

Bhandara Flood
Bhandara Flood
author img

By

Published : Aug 16, 2022, 7:18 PM IST

Updated : Aug 16, 2022, 7:32 PM IST

भंडारा - जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदी अखेर फुगली असून तिच्या धोका पातळीपेक्षा 3 मिटर जास्त पाणी वाहत आहेत. शहराला पुराचा वेढा घातला गेला आहे. यात विशेष म्हणजे भंडारा शहरालगत असलेल्या टाकली- खमाटा येथे पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर मुख्य राज्यमार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, खमाटा, कपिलनगर, गणेश नगरी, गणेशपुर, भोजपुर आदि शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना स्थलांतरित केले आहे. तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल 150 कुटुंब सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

भंडारा शहराला पडलेला पुराचा वेढा

धोक्याची पातळी पेक्षा 5 मीटर अधिक पाणी : भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीची धोका पातळी २४५.50 मीटर एवढी आहे. सध्या नदीची पाणी पातळी 248.16 मीटर एवढी असून प्रशासनाच्या सांगण्यानुसार पाणी पातळी 250.90 मीटरपर्यंत वाढणार आहे. प्रशासनाचा अंदाज खरा ठरला तर 2020 मध्ये आलेल्या पुऱ्याप्रमाणे भंडारा शहराला पुराचा मोठा फटका बसू शकेल. आता ज्या भागात पाणी शिरलेला आहे तेथील रहिवाशांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र वैनगंगा नदीची पाणीपातळी वाढल्यास अजूनही बऱ्याच भागांमध्ये पाणी शिरेल आणि नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

गोसे धरण 3 मीटरने उघडले : वैनगंगा नदीची पाणी पातळी नियंत्रण ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे उघडण्यात आले असून यापैकी 21 दार हे तीन मीटरने आणि 12 दार हे अडीच मीटरने उघडण्यात आलेले आहे. यामधून 17145 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या पावसामुळे छाती तालुक्यातील एकूण 82 रस्ते हे बंद झाले आहेत तर 182 कुटुंबांना स्थलांतरित करून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2020 प्रमाणेच जर पूरपरिस्थिती निर्माण झाली तर यापेक्षा ही ज्यास्त नागरिक बाधित होणार आहेत.

सुरक्षा पथकांना पाचारण : जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या पावसामुळे तसेच नदीच्या वरच्या भागात झालेल्या पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याचे लक्षात येताच जिल्हाधिकारी यांनी खासदार सुनील मेंढे यांच्यासह संपूर्ण रात्र फिरून ज्या ठिकाणी पुराचे पाणी जात होतं त्याची पाहणी केली. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. तसेच एसडीआरएफ यांच्या समूहालाही पाचारण करण्यात आलेला आहे. पाणी गेलेल्या भागातून नागरिकांना बाहेर सुखरूप काढण्याचे काम जिल्हा शोध व बचत पथक रात्रीपासूनच करीत आहे. पुढच्या काही तासात 248 वरून 250.90 पर्यंत जर नदीची पाणी पातळी वाढली तर या पेक्षा मोठा पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे.

हेही वाचा - Deccan Queen Express डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला तांत्रिक बिघाडा अन् जोराच्या पावसामुळे मध्य रेल्वे प्रवाशांचा खोळंबा

Last Updated : Aug 16, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.