ETV Bharat / state

भंडाऱ्यात मोकाट कुत्र्यांची हैदोस... वराठी गावात तब्बल 11 बालकांचा चावा - bhandara news

वराठी गावात अनेक भागात मोकाट कुत्र्यांचे वास्तव्य आहे. सर्वाधिक मोकाट कुत्रे आठवडी बाजारात आहेत. ते येथे मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या मांसाच्या तुकड्यांवर ताव मारतात. यानंतर मांसाची चटक लागलेले हे कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्या बालकांना ते आपले लक्ष्य बनवतात.

11-child-bites-by-dogs-in-bhandara
भंडाऱ्यात मोकाट कुत्र्यांची हैदोस...
author img

By

Published : Feb 25, 2020, 11:58 AM IST

भंडारा- जिल्ह्यातील वरठी गावात मोकाट कुत्र्यांची हैदोस दिवसेंदिवस वाढत आहे. या कुत्र्यांनी कालपासून 11 बालकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

भंडाऱ्यात मोकाट कुत्र्यांची हैदोस...

हेही वाचा- दिल्ली गोळीबार; पोलीस कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू, तर डिसीपी गंभीर

वराठी गावातील आठवडी बाजार परिसर, सुभाष वार्ड, शास्त्री वार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड, नेहरू वार्ड व हनुमान वार्डात या मोकाट कुत्रांची मागील काही दिवसांपासून दहशत आहे. सोमवारी याच भागातील बालकांना कुत्र्याने जखमी केले आहे. कुवर श्रीवास्तव (वय 13) या चिमुकलीच्या गालावर चावा घेतल्याने तिला गंभीर दुखापत झाली आहे. तर संचारी माळवे (वय 6), कृष्णा दास, आरव सक्सेना, स्पर्श खोब्रागडे (2 वर्ष), गौरीश कारेमोरे (वय 4), सनया उके, आलिया बोदीले वय (साडे तीन वर्ष), आदेश हिंगे या बालकासह शुद्धोधन बोरकर (वय 48) यांनाही या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

सर्व जखमी बालकावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. या मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यामुळे नागरिक आणखीनच धास्तावलेल्या आहेत. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्रांचा बंदोबस्त वन विभाग व पोलीस विभागाच्या सहकार्याने करणार असल्याची माहिती उपसरपंच पाटील यांनी दिली आहे. तसेच पाळीव कुत्र्यांना बेल्ट बांधावे, असे नागरिकांना सांगून उर्वरित कुत्र्यांना लवकर बंदोबस्त करू, असे त्यांनी सांगितले.

वराठी गावात अनेक भागात मोकाट कुत्र्यांचे वास्तव्य आहे. सर्वाधिक मोकाट कुत्रे आठवडी बाजारात आहेत. आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या मांसाच्या तुकड्यांवर कुत्रे ताव मारतात. यानंतर मांसाची चटक लागलेले हे कुत्रे येणाऱ्या-जाणाऱ्या बालकांना ते आपले लक्ष्य बनवतात. त्यामुळे वेळीच या कुत्र्यांना पकडून त्याची योग्य व्यवस्था लावली गेली नाही तर, कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.