ETV Bharat / state

बीडमध्ये पाणी पेटले; पाणीटंचाई विरोधात महिलांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा

शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. 20 ते 25 दिवसातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात महिलांनी हंडा मोर्चा काढला.

बीडमध्ये पाणी पेटले; पाणीटंचाई विरोधात महिलांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा
author img

By

Published : Jun 17, 2019, 5:41 PM IST

बीड - शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. 20 ते 25 दिवसातून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वात महिलांनी हंडा मोर्चा काढला. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेवर संदीप क्षीरसागर यांचे काका भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आहे. त्यामुळे काकांच्या विरोधात पुतण्याने मोर्चा काढल्याचे पाहायला मिळाले.

बीडमध्ये पाणी पेटले; पाणीटंचाई विरोधात महिलांचा नगरपालिकेवर हंडा मोर्चा

बीड नगरपालिका शहराला पाणी पुरवठा करण्यास अकार्यक्षम असल्याचे सांगत संदीप क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, बीड शहरातील जनतेचे पाण्याअभावी हाल होत आहेत. याठिकाणी चक्क 20 ते 25 दिवसांनी शहराला पाणी पुरवठा केला जात आहे.

त्यामुळे पालिका शहराला सुरळीत पाणीपुरवठा करू शकत नसेल, तर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, हेमा पिपळे, बबन गवते यांची उपस्थिती होती. त्याबरोबरच शहरातील महिलांचीही यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Intro:बीडमध्ये पाणी पेटले; नगर पालिकेच्या विरोधात हंडा मोर्चा

बीड- शहराचा पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णतः कोलमडले आहे. वीस ते पंचवीस दिवसाला बीड शहराला पाणीपुरवठा केला जातो. बीड नगरपालिकेत काका भारतभूषण क्षीरसागर यांची सत्ता आहे. पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकाविरोधात हंडा मोर्चा काढला. जर पालिका वेळेवर पाणी पुरवठा करणार नसेल तर भारतभूषण क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी यावेळी केली.

Body:यावेळी माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. सुनील धांडे, हेमा पिपळे, बबन गवते यांची उपस्थिती होती. बीड नगर पालिका बीड शहराला पाणी पुरवठा करण्यास अकार्यक्षम असल्याचे सांगत संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हा अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरातील जनतेचे पाण्याअभावी हाल होत आहेत. चक्क वीस ते पंचवीस दिवसाला शहराला पाणी पुरवठा केला जातो. जर बीड पालिका शहराला सुरळीत पाणीपुरवठा करू शकत नसेल तर नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी पुतणे संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.

Conclusion:शहरातील महिलांची यावेळी मोठी संख्या होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.