बीड - केंद्र सरकारने वाढवलेल्या गॅस दरामुळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. उज्ज्वला योजनेअंतर्गत दिलेले गॅस आता पुन्हा भरून घेण्यासाठी गोरगरीब नागरिकांना अधिक पैसे भरावे लागत आहेत. याविरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष माधुरी घुमरे, कमल निंबाळकर यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रविवारी निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
हेही वाचा - गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे चूल पेटवून आंदोलन
उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडर ठेवले गुंडाळून
केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करत देशभरातील गोरगरीब नागरिकांना उज्ज्वला योजनेअंतर्गत जास्त सिलेंडरचे वाटप केले. मात्र, आता पुन्हा ते सिलेंडर भरून घेताना अव्वाच्या सव्वा पैसे घेतले जात असल्याने गोरगरीब नागरिकांनी उज्ज्वला योजनेचे गॅस गुंडाळून ठेवले असल्याचेही या वेळी आंदोलक महिलांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा - इंग्लंडहून परतलेले दहा प्रवासी क्वारंटाईन; दोन पॉझिटिव्ह...!