बीड - संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे प्रचंड मतांनी विजयी होऊन आमदार व्हावेत, यासाठी शहरातील महिलांनी प्रभु वैद्यनाथ येथे जलाभिषेक करून वैद्यनाथाला साकडे घातले. परळी विधानसभेची निवडणूक मुंडे विरुध्द मुंडे अशी बहिण-भावात अतिषय अटीतटीची लढत झाली आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात सर्व सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी, दलित समाजाचे प्रश्न धनंजय मुंडे यांनी सोडविले आहेत. सत्ताधाऱ्यांना विधान परिषदेत सळो की पळो करून सोडले आहे, त्यामुळे धंनजय मुंडे हे आमदार व्हावेत, असे साकडे घालत महिलांनी भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाला जलाभिषेक केला.
हेही वाचा - 'एका पुतण्याने धोका दिला म्हणून काय झालं, हजारो पुतणे माझ्याबरोबर आहेत'
यावेळी वैशाली तिडके, सुलभा साळवे, कमल निंबाळकर, अर्चना वैजनाथ रायभोळे, करुणा विजय किरणे, अशाताई क्षीरसागर, विजयमाला रतन काकडे, लता आलदे, वनमाला तालवंडे, दगडुबाई कांबळे, वंदना रोडे, सुवर्णा ताटे, शांता साखरे, सुवर्णा शिंदे, मिरा हरेल आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेही वाचा - धुळे, गिरीश महाजन महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारपासून दूर?