ETV Bharat / state

कोण होणार भाजपचा प्रदेशाध्यक्ष? 'या' नावांची जोरदार चर्चा

दानवे यांच्या मंत्रीपदामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पदावर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजप
author img

By

Published : May 31, 2019, 11:42 PM IST

बीड - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. दानवे यांच्या मंत्रीपदामुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या पदावर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या देखील नावाची चर्चा होत आहे. येत्या आठवड्यात महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे

बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी संपूर्ण राज्यभरात जाहीर सभा घेतल्या होत्या. त्यांच्या सभांना राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत होता. यामध्ये सध्या रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. येत्या दोन दिवसात रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघात आपल्या नेतृत्वाची चुणूक मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवून दिली आहे. बीड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात देखील त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

बीड लोकसभा मतदारसंघात शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे बीड जिल्ह्यात भाजपच्या विरोधात असताना देखील मोठ्या मताधिक्क्याने डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या. बहिण भावाच्या लढतीमध्ये बहिण सरस ठरली आहे. याशिवाय प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा वगळता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एकानेही बीड जिल्ह्यात सभा न घेता मोठ्या मताधिक्क्याने डॉ. प्रीतम मुंडे विजयी झालेल्या आहेत. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांनी आपली छाप सोडली आहे. याचाच परिणाम मंत्री मुंडे यांना भाजप कडून प्रदेशाध्यक्षपद मिळू शकतो.

Intro:पंकजा मुंडे यांच्या रूपाने बीडला भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद मिळण्याची शक्यता?

बीड- भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली आहे. येत्या दोन दिवसात रावसाहेब दानवे हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. दानवे यांच्या मंत्रिपदा मुळे रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदी बीडच्या पंकजा मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन यांच्या देखील नावाची चर्चा होत आहे. येत्या आठवड्यात आठवड्यात महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदाची निवड होण्याची शक्यता आहे.

Body:बीड लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी संपूर्ण राज्यभरात जाहीर सभा घेतल्या होत्या त्यांच्या सभांना राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळतो. यामध्ये सध्या रिक्त झालेल्या प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू आहे मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघात आपल्या नेतृत्वाची चुणूक मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवून दिली आहे. बीड जिल्ह्याच्या राजकीय समीकरणात देखील त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.

Conclusion:बीड लोकसभा मतदारसंघात शिवसंग्राम चे आ. विनायक मेटे बीड जिल्ह्यात भाजप च्या विरोधात असताना देखील मोठ्या मताधिक्क्याने डॉ. प्रीतम मुंडे यांना विजयी करण्यामध्ये मंत्री पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या. बहिण भावाच्या लढतीमध्ये बहीण सरस ठरली आहे. याशिवाय प्रीतम मुंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची सभा वगळता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पैकी एकानेही बीड जिल्ह्यात सभा न घेता ही मोठ्या मताधिक्क्याने डॉ. प्रीतम मुंडे विजयी झालेल्या आहेत. एकंदरीत या सर्व पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांनी आपली छाप सोडली आहे. याचाच परिणाम मंत्री मुंडे यांना भाजप कडून प्रदेशाध्यक्षपद मिळू शकतो.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.