ETV Bharat / state

शिक्षकाने केली बदनामी.. विवाहित प्रियकरासह अल्पवयीन प्रेयसीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या - शिक्षकाने बदनामी केल्याने आत्महत्या

गावातीलच एका शिक्षकाने त्यांच्याबद्दल बदनामीकारक चर्चा केली होती. या दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावात झाल्याने अल्पवयीन मुलगी तणावाखाली होती. 'आई, बाळूकाकांच्या घरच्यांना त्रास देऊ नकोस.  आमच्या दोघात काहीही नव्हतं. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. काही नसताना 'त्या' सरांनी साऱ्या गावात केलं' अशी चिठ्ठी मुलीने लिहून ठेवली होती.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Jan 20, 2020, 3:09 AM IST

Updated : Feb 9, 2020, 4:26 PM IST

बीड - तालुक्यातील जातेगाव येथे रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीसह एका विवाहित व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गावातील शिक्षकाने बदनामी कल्यामुळे हे पाऊल उचलत असल्याचे मुलीने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

बाळू विठोबा जाधव (वय २९) व १५ वर्षीय मुलगी अशा दोघांचा या घटनेत मृत्यू झाला आहे. शनिवारी रात्रीपासूनच हे दोघे बेपत्ता होते. बाळू हे विवाहित असून त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. बाळू गावातीलच एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. तर, मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शेजारी असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे- जाणे असायचे. हे दोघे फोनवरदेखील बोलायचे त्यामुळे गावातीलच एका शिक्षकाने त्यांच्याबद्दल बदनामीकारक चर्चा केली होती. या दोघांच्या प्रेमसंबंधाची चर्चा गावात झाल्याने अल्पवयीन मुलगी तणावाखाली होती.

मृत बाळू विठोबा जाधव
मृत बाळू विठोबा जाधव

'आई, बाळूकाकांच्या घरच्यांना त्रास देऊ नकोस. आमच्या दोघात काहीही नव्हतं. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो. काही नसताना 'त्या' सरांनी साऱ्या गावात केलं' अशी चिठ्ठी मुलीने लिहून ठेवली होती. मुलगी शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता अचानक घरातून गायब झाली. शेजारी राहणारे बाळू जाधव हेदेखील बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यामुळे मुलीच्या वडिलांनी बाळूवर संशय व्यक्त करत त्यांच्याविरुध्द तलवाडा पोलिसात तक्रार दिली. सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी बाळूवर रविवारी पहाटे दीड वाजता अपहरणाचा गुन्हा नोंदवला.

हेही वाचा - पतीने विभक्त राहणार्‍या पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; बदनामीची धमकी देत मुलाचा मागितला ताबा

रविवारी सकाळी पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. दुपारी तीन वाजता गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला. यावेळी काठावर बाळू जाधव यांचे पाकीट सुसाईट नोट आढळून आली. सुरुवातीला बाळू जाधव यांनी तिचा घातपात केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. परंतु, काही वेळाने त्यांचाही मृतदेह याच विहिरीत आढळला. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. तिथे उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांच्याही नातेवाईकांचे जवाब नोंदवून योग्य ती कारवाई केली जाईल, असे सहाय्यक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले आहे. ज्या शिक्षकाचा सुसाईट नोटमध्ये उल्लेख आहे, त्याचीही चौकशी केली जाणार आहे.

Intro:धक्कादायक; प्रेमीयुगुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या; शिक्षकाने बदनामी केल्याचे म्हटले आहे सुसाईड नोटमध्ये

बीड- 'आई, बाळूकाकाच्या घरच्यांना त्रास देऊ नकोस, आमच्या दोघात काही नव्हतं. आम्ही फक्त फोनवर बोलत होतो, 'त्या' सरांनी साऱ्या गावात केलं काही नसतानी' अशा आशयाची चार ओळींची चिठ्ठी लिहून एका अल्पवयीन प्रेयसीसह तिच्या विवाहित प्रियकराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील जातेगाव येथे रविवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना उघडकीस आली. दरम्यान, शनिवारी रात्रीपासूनच ते दोघे बेपत्ता होते.

बाळू विठोबा जाधव (२९) व १५ वर्षीय रिता (नाव काल्पनिक घेतले आहे) हे दोघे शेजारी राहत. बाळू विवाहित असून त्यास दोन मुले व एक मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. बाळू गावातीलच एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत असे तर रिता ही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शेजारी असल्याने एकमेकांच्या घरी येणे- जाणे असायचे. यातून रिताचा मोबाइल क्रमांक बाळूला सहज उपलब्ध झाला आणि त्यांचे फोनवरुन बोलणे सुरु झाले. बाळूसोबत रिता सतत फोनवरुन संपर्कात असल्याने त्यांच्या प्रेमसंबंधाची गावात चर्चा होती. गावातीलच एका शिक्षकानेही त्यांच्याबद्दल बदनामीकारक चर्चा केल्याने रिता नाराज झाली होती. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता रिता अचानक घरातून गायब झाली तर शेजारी राहणारा बाळू जाधव हा देखील बेपत्ता असल्याचे समोर आले. रिताच्या वडिलांनी बाळूवर संशय व्यक्त करत त्याच्याविरुध्द तलवाडा पोलिसांत फिर्याद दिली. रिता अल्पवयीन असल्याने सहायक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी बाळूवर रविवारी पहाटे दीड वाजता अपहरणाचा गुन्हा नोंद केला. रविवारी सकाळी रिता व बाळूची पोलिसांनी शोधाशोधही सुरु केली होती. दुपारी तीन वाजता गावापासून एक किमी अंतरावर असलेल्या
मनोहर मस्के यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यावर तरंगताना रिताचा मृतदेह आढळून आला. तलवाडा पोलिसांनी धाव घेतली. यावेळी काठावर बाळू जाधवचे पॉकेट, आधार कार्ड व काही पैसे आढळून आले. या पॉकेटजवळच पोलिसांना सुसाईट नोटही आढळून आली. सुरुवातीला बाळू जाधवने तिचा घातपात केला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती; परंतु काही वेळाने त्याचाही मृतदेह याच विहिरीत आढळला. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. तेथे उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.

नातेवाईकांच्या जवाबानंतर पुढील कार्यवाही-

सुसाईट नोटमधील मजकुरावरुन त्या दोघांनी आत्महत्या केल्याचा अंदाज असून त्यांच्या प्रेमसंबंधाबाबत शिक्षकाने केलेली चर्चा आणि बदनामीला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात बाळू जाधववर आधीच अपहरणाचा गुन्हा नोंद झाला होता. दोघांच्या आत्महत्येप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दोघांच्याही नातेवाईकांचे जवाब नोंदवून योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे सहायक निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार ज्या शिक्षकाचा सुसाईट नोटमध्ये उल्लेख आहे, त्यालाही तपासले जाईल, असे उनवणे म्हणाले.
Body:बConclusion:ब
Last Updated : Feb 9, 2020, 4:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.