ETV Bharat / state

कोरोना संबंधी अफवा, बीड जिल्ह्यातील दोघांना आष्टीत अटक

‘आष्टीत कोरोनाचा रुग्ण आढळला’ असे व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवणार्‍या व अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोघांना आष्टी पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतले आहे.

अफवा पसरवणाऱ्या दोघांना आष्टीत अटक
अफवा पसरवणाऱ्या दोघांना आष्टीत अटक
author img

By

Published : Mar 15, 2020, 5:06 PM IST

बीड - नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशा स्थितीत सोशल मीडियावर कोरोना संदर्भात अफवा पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकरणी आष्टी येथील दोघांना पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली आहे. प्रथमेश आवारे व ऋषिकेश वीर अशी अटक करण्यात करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

माहितीनुसार, ‘आष्टीत कोरोनाचा रुग्ण आढळला’ असे व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवणार्‍या व अशी पोस्ट व्हायरल करणाऱ्या दोघांना आष्टी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले आहे. आष्टी येथील ऋषिकेश वीर याने पीडिताला फोन करून ऑनलाईन येवून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस बघ असे सांगितले. त्याने स्टेटसला ‘आष्टी कोरोना, पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला, त्यावर पीडित रुग्ण म्हणून फोटो व नाव टाकले होते. हे स्टेटस पाहून पीडितास मानसिक धक्का बसला, त्याने ऋषिकेशला स्टेटस काढून टाकण्यास (डिलीट) सांगितले. दरम्यान सदरील स्टेटस अनेकांनी स्क्रीनशॉट काढून शेअर केले होते.

हेही वाचा - कोरोनाची धास्ती : खरेदी-विक्रीत तब्बल 50 टक्क्यांनी घट, व्यापाऱ्यांकडून चिंता व्यक्त

या प्रकरणी असा मजकूर तयार करणार्‍या प्रथमेश आवारे व शेअर करणार्‍या ऋषिकेश वीर यांनी कोरोनाबद्दल मनात भय निर्माण होईल, अशी अफवा पसरवल्याप्रकरणी या दोघांवर आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, पोनि.माधव सुर्यवंशी यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोउनि. अमितकुमार करपे करत आहेत.

हेही वाचा - राष्ट्रीय कृत बॅंकांचा कागदोपत्री व्यवहार मराठीत करण्याची शेतकरी संघर्ष समितीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.