बीड - गेवराईतील संजय नगर भागात राहणाऱ्या एका २४ वर्षीय तरुणाने बुधवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. हरून अहमद शेख, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरून याचे दोन वर्षापूर्वी लग्न संजय नगर भागातच राहणाऱ्या एका मुलीशी झाले होते. आई-वडील तसेच सासू-सासरे यांच्यापासून हरून विभक्त राहत होता.
बुधवारी अचानक हरुन याने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बडे करत आहेत.