ETV Bharat / state

Gram panchayat elections : 704 ग्रामपंचायत निवडणुका, पंकजा व धनंजय मुंडे यांच्यात चुरस

राज्यात 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या टप्प्यामध्ये होणार आहेत. (7751 gram panchayat elections in the state)

Tough fight between BJP leader Pankaja Munde and former minister Dhananjay Munde
भाजप नेत्या पंकजा मुंडे व माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या चुरशीची लढत
author img

By

Published : Nov 24, 2022, 1:28 PM IST

Updated : Nov 24, 2022, 2:16 PM IST

बीड: राज्यात 7751 ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. बीड जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका या टप्प्यामध्ये होणार आहेत, तर बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील वातावरण थंडीतही गरम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, उध्दव ठाकरे शिवसेना व शिंदे शिवसेना, काँग्रेस, आप या पक्षामध्ये मोठी रस्सीखेच होताना पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत बीड तालुक्यातील आहेत तर सर्वात कमी ग्रामपंचायत या वडवणी तालुक्यात आहेत. (7751 gram panchayat elections in the state)

खालीलप्रमाणे तालुका निहाय संख्या:बीड-132 पाटोदा- 34 परळी 80 माजलगाव -44 शिरूर -24 आंबेजोगाई- 83 आष्टी -109 धारूर- 31 गेवराई- 76 केज -66 वडवणी -25 एकूण 704 ग्रामपंचायत निवडणुका होणार आहेत.

चुरशीची लढत: बीड जिल्ह्यात परळी मतदार संघात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे, तर बीडमध्ये काका पुतण्यांची लढाई पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आष्टी पाटोदा, शिरूर मध्ये भाजप व राष्ट्रवादी तर माजलगाव वडवणी मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये तर केज आंबेजोगाई मध्ये भाजप, काॅग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये ही निवडणूक मोठ्या चुरशीची लढली जाणार आहे, तर बीड मतदार संघात मात्र भाजप राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस सह आप पक्ष निवडणुकीत उतरणार आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यात हि निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

Last Updated : Nov 24, 2022, 2:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.