बीड - येथील जिल्हा आरोग्य विभागाकडून सोमवारी 57 व्यक्तींचे स्वॅब पाठवण्यात आले होते. यापैकी 50 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 7 जणांचे रिपोर्ट प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. आजघडीला बीड जिल्हा रुग्णालयात 39 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.
दिवसेंदिवस बीड जिल्ह्यात कोरोना वाढत असतानाच मंगळवारी 57 पैकी 50 स्वॅब निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. उर्वरित 7 स्वॅबचे रिपोर्ट प्रलंबित असून बुधवारी सायंकाळपर्यंत रिपोर्ट येण्याची शक्यता असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. बीड जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 39 एवढी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.