बीड - जिल्ह्यातून शनिवारी 43 स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले होते. त्यामध्ये तीन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कुंडी, वडवणी व बीड येथील रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातून शनिवारी 43 स्वॅब तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यापैकी 3 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 39 निगेटिव्ह आले आहेत. तर 1 व्यक्तीच्या स्वॅब अनिर्णायक आहे. यापूर्वी 6 स्वॅबबाबतही कुठलाच निष्कर्ष निघालेला नव्हता. आता ते सहा स्वॅब आज रात्री प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार आहेत.
शनिवारी पॉझिटिव्ह आलेले 3 आणि यापूर्वीचे सक्रिय 30 असे मिळून 33 रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. 6 रुग्ण पुण्यात हलविले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक रुग्ण बरा झालेला आहे.
बीडच्या त्या रुग्णाने गाठले थेट जिल्हा रुग्णालय-
बीड शहरात आढळलेला रुग्ण हा पालवण चौकातील असून तो मुंबईहून येतानाच त्याला लक्षणे आढळून आल्याने तो घरी न जाता थेट जिल्हा रुग्णालयात गेलेला आहे. तर वडवणीत आढळलेला रुग्ण हा पुर्वीच्या एका रुग्णाच्या संपर्कातील आहे. तर कुंडी येथील रुग्णही पुर्वीच्याच रुग्णाच्या संपर्कातील आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
बीडमध्ये शनिवारी आढळले 3 जण कोरोना पॉझिटिव्ह; 39 अहवाल निगेटिव्ह
शनिवारी पॉझिटिव्ह आलेले 3 आणि यापुर्वीचे सक्रिय 30 असे मिळून 33 रुग्ण सध्या जिल्ह्यात उपचार घेत आहेत. या पैकी 6 रुग्णांना उपचारासाठी पुण्यात हलविले आहे, तर एक मृत्यू झाला आहे. तर अन्य एक रुग्ण बरा झालेला आहे.