ETV Bharat / state

बीड : पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

author img

By

Published : Mar 16, 2021, 8:27 AM IST

शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

threatening to kill police officer in beed
बीड: पोलीस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून जीवे मारण्याची धमकी; दोघांविरोधात गुन्हा दाखल

बीड - पोलीस कर्मचार्‍याला शिविगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात घडली आहे. याबाबत दोघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपान दत्तोबा बडगे (रा. बेलखंडी पाटोदा) व अभिषेक असाराम पवळ (रा. संभाजीनगर, बीड), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीेनची नावे आहेत.

दोघांना अटक करून गुन्हा दाखल -

सोमवारी संदीपान व अभिषेक हे दोघेही आपल्या स्कॉर्पिओमध्ये डिझेल भरण्याकरिता चर्‍हाटा फाट्यावर असलेल्या उबाळे यांच्या पेट्रोल पंपावर गेले. तेथे डिझेल भरल्यानंतर पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांने पैसे मागितले असता. त्यांनी कर्मचाऱ्यांची वाद घातला. अखेर पंपमालकाने या घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर दोघांनी पोलिस ठाण्यात उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांशीदेखील हूज्जत घातली. यावेळी दोघांनी उपस्थित पोलीस कर्मचारी जालिंदर नान बनसोडे यांची कॉलर पकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील शिविगाळ केली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - 'हिरेन मृत्यूप्रकरणी सरकारला कोणताही धोका नाही; आमचे सरकार मजबूत'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.