ETV Bharat / state

बीडमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच; महिलेवर कोयत्याने वार करून लुटमार - महिलेवर कोयत्याने वा

हुसेनाबी नवाब शाह असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर अंबाजोगाई येथील स्व.रा.ती. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धारुर शहरात पोलिसांचे निष्क्रियतेमुळे चोऱ्यांचे सत्र सुरुच असून नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोयत्याने वार करून लुटमार
कोयत्याने वार करून लुटमार
author img

By

Published : Aug 26, 2020, 5:06 PM IST

बीड - जिल्ह्यातील धारूर शहरातील आझादनगर भागातील एका महिलेवर चोरट्यांनी बुधवारी पहाटे हल्ला केला. सकाळी चारच्या सुमारास घरात घुसून चोरट्यांनी कोयत्याने हल्ला केला. यासह लुटमार करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हुसेनाबी नवाब शाह असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर अंबाजोगाई येथील स्व.रा.ती. रुग्णालयात हलवण्यात आले आहे. धारुर शहरात पोलिसांचे निष्क्रियतेमुळे चोऱ्यांचे सत्र सुरुच असून नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी शहरातील गिता ज्ञान आश्रमात चोरट्यांनी धुडगूस घातल्याची घटना ताजी असताना दुसऱ्याच दिवशी सदरील घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

हेही वाचा - कोविड लसीचा भारती विद्यापीठात करण्यात आला प्रयोग - राज्यमंत्री विश्वजित कदम

शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा परिसरातील आझाद नगर भागातील रहिवाशी या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. येथील ग्रामीण रुग्णालयात महिलेवर प्राथमिक उपचारकरुन अंबाजोगाईला हलवण्यात आले. पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे. ऐन सणासुदीच्या काळात घडत असलेल्या चोरीच्या घटना पोलिसांसाठी आवाहन ठरत आहे. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी घटनास्थळी जावून सखोल चौकशी सुरू केली आहे. प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा - 'मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला संसार शोधायला सुरूवात'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.