बीड : जिल्ह्याच्या दृष्टीने रेल्वे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. नगर बीड परळी रेल्वे पाहण्यासाठी जिल्ह्यावासियांना २७ वर्षे चातकाप्रमाणे प्रतिक्षा करावी लागली आहे. अहमदनगर ते आष्टी या ६० किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. बुधवारी सकाळी नगरहून सोलापूरवाडी येथे पूजन होऊन आष्टीपर्यंत रेल्वे धावली आहे. रेल्वे प्रकल्पामुळे बीड ( Railway Project Beed ) जिल्ह्यांतील कृषी, औद्योगिक आणि पर्यटन उद्योगांना चालना मिळून विकासाला गती मिळणार आहे. अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्ग २६१ किलोमीटरचा असून गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे नसल्याने औद्योगिक वसाहती निर्माण होण्यास मोठ्या अडचणी येत होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
बीड रेल्वेचा असा आहे इतिहास-
१९९५ साली या नगर बीड परळी रेल्वे मार्गला तत्वतः मंजुरी मिळाली होती. त्यावेळी या प्रकल्पाचा खर्च हा केवळ ३५३ कोटी अपेक्षित होता. मात्र, बीड-नगर रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाकडून निधी देण्यास टोलवाटोलवीच केली गेली. अनेक वर्ष हा प्रकल्प रखडल्याने या रेल्वे मार्गासाठी आता २८०० कोटीची आवश्यकता आहे. परंतु केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) सत्तेत आल्यावर स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहास्तव या २७ वर्षाहून अधिक काळापासून रखडलेल्या कामाकडे लक्ष दिले. त्यामुळे हे काम प्रगतीपथाने पूर्ण झाले असून आज सकाळी ८ वाजता नगर येथून सोलापूरवाडी, कडा आणि आष्टी इथपर्यंत रेल्वे प्रत्यक्ष धावली. त्यामुळे स्व. गोपीनाथ मुंडे ( Loknete Gopinath Munde ) यांचे स्वप्न साकार झाले आहे. रेल्वे पाहण्यासाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तसेच सायंकाळी ४ वाजता खा. प्रितमताई मुंडे ( MP Pritam Munde ) यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर हायस्पिडने रेल्वे नगरकडे रवाना होणार आहे.
रेल्वेच्या संघर्षात योगदान देणार्यांचे अभिनंदन - मंत्री धनंजय मुंडे
-
अनेक वर्षांपासूनचे #बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न साकारत आहे! आज नगर ते आष्टी या महामार्गावर चाचणी होत आहे. बीड रेल्वेच्या उभारणीत केंद्राच्या बरोबरीने 50% वाटा देणाऱ्या राज्य शासनाचे तसेच या संघर्षात योगदान दिलेल्या प्रत्येक बीड जिल्हा वासीयांचे आभार व अभिनंदन! #बीड_रेल्वे pic.twitter.com/PDf5oZthAE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 29, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">अनेक वर्षांपासूनचे #बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न साकारत आहे! आज नगर ते आष्टी या महामार्गावर चाचणी होत आहे. बीड रेल्वेच्या उभारणीत केंद्राच्या बरोबरीने 50% वाटा देणाऱ्या राज्य शासनाचे तसेच या संघर्षात योगदान दिलेल्या प्रत्येक बीड जिल्हा वासीयांचे आभार व अभिनंदन! #बीड_रेल्वे pic.twitter.com/PDf5oZthAE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 29, 2021अनेक वर्षांपासूनचे #बीड जिल्हा वासीयांचे स्वप्न साकारत आहे! आज नगर ते आष्टी या महामार्गावर चाचणी होत आहे. बीड रेल्वेच्या उभारणीत केंद्राच्या बरोबरीने 50% वाटा देणाऱ्या राज्य शासनाचे तसेच या संघर्षात योगदान दिलेल्या प्रत्येक बीड जिल्हा वासीयांचे आभार व अभिनंदन! #बीड_रेल्वे pic.twitter.com/PDf5oZthAE
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) December 29, 2021
-
उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली @DrPritamMunde अजून एक record तुमच्या नावावर...thanks @Dev_Fadnavis @SMungantiwar आणि @narendramodi @PMOIndia आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!! pic.twitter.com/SEoSUUXV2c
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 28, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली @DrPritamMunde अजून एक record तुमच्या नावावर...thanks @Dev_Fadnavis @SMungantiwar आणि @narendramodi @PMOIndia आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!! pic.twitter.com/SEoSUUXV2c
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 28, 2021उद्या एक साकार स्वप्न धावणार बीडमध्ये !!! माझ्या जिल्ह्यातील प्रत्येक घटकांचे अभिनंदन ज्यांनी अनेक दशके लढाई दिली @DrPritamMunde अजून एक record तुमच्या नावावर...thanks @Dev_Fadnavis @SMungantiwar आणि @narendramodi @PMOIndia आमच्या शब्दाला पूर्ण करण्यात योगदान दिले.. धन्यवाद!! pic.twitter.com/SEoSUUXV2c
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) December 28, 2021