ETV Bharat / state

Raj Thackeray In Parli Court : राज ठाकरे परळी न्यायालयात हजर; 500 पाचशे रुपये दंड भरून वॉरंट केले रद्द - Raj Thackeray

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अटक वॉरंट आज परळी न्यायालयाने रद्द केले आहे. 2008 मधील एका प्रकरणात न्यायालयाने राज ठाकरे यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज स्वत: परळी न्यायालयात हजर होते. न्यायालयाने त्यांना 500 रुपये दंड ठोठावत त्यांचे अटक वॉरंट रद्द केले आहे.

raj thackeray in parli court
परळी दिवाणी न्यायालयात राज ठाकरे हजर
author img

By

Published : Jan 18, 2023, 4:26 PM IST

बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट आज परळी न्यायालयाने रद्द केले. 2008 मध्ये एका प्रकरणात न्यायालयाने राज ठाकरेंना अटक वॉरंट जारी केले होते. अटक वॉरंट रद्द करण्यासाठी राज ठाकरे आज स्वत: परळी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांच्यावर 500 ठोठावला. तसेच अटक वॉरंट रद्द केले आहे अशी माहिती अ‍ॅड. अर्चित साखळकर यांनी दिली.

ठाकरे यांच्याविरोधात विरोधात अटक वॉरंट - 2008 साली राज ठाकरे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी ते आज परळी न्यायालयासमोर राज ठाकरे हजर झाले. कोविड काळामध्ये कोर्टाची सुनावणी असताना न्यायालयाने ठाकरे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. त्यानंतर राज ठाकरे यांची सर्जरी झाल्याने त्यांना डॉक्टरांनी काही प्रोटोकॉल फॉलो करायला सांगितले होते. त्यामुळे ठाकरे यांना लांबचा प्रवास करणे शक्य नव्हते. त्यामुळे ठाकरे आज न्यायालयासमोर हजर झाले. त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या सर्व वकील मंडळींनी त्यांचा एक अर्ज न्यायालयात दाखल केला. त्यात सर्व कारणे नमूद केली आहेत. जारी केलेले वॉरंट रद्द करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने कोर्टात हजर राहण्याची दखल घेत त्यांचे वॉरंट रद्द केले आहे, असे वकिलांनी सांगितले.

राज ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट परळीला - राज ठाकरे आज सुनावणीसाठी परळी कोर्टात येणार असल्याने याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. राज ठाकरे हेलिकॉप्टरने मुंबईहून थेट परळीला आले. याठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर राज ठाकरे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. तेथून राज ठाकरे थेट परळी कोर्टाकडे रवाना झाले होते.

स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी केली गर्दी - राज ठाकरे परळी न्यायालयात आले तेव्हा, त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याशिवाय, राज यांना पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 'राज ठाकरे जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या. बराचकाळ घोषणाबाजी सुरू होती. यामुळे न्यायाधीश चिडले. अखेर कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट काढत राज ठाकरे न्यायालयाच्या आतमध्ये पोहोचले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांचाच युक्तिवाद झाला. त्यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले.

राज ठाकरे यांच्यासाठी ५० फुटांचा हार - राज ठाकरे यांनी परळी कोर्टात जाण्यापूर्वी गोपीनाथ गडाला भेट दिली. या गावचे सरपंच सुशील कराड यांनी राज ठाकरे यांच्यासाठी ५० फुटांचा हार तयार केला होता. त्यांनी राज यांचे जंगी स्वागत केले. सुशील कराड हे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत. तत्पूर्वी राज ठाकरे यांचे हेलिकॉप्टर इंधन भरण्यासाठी औरंगाबाद शहरानजीक पळशी गावात थांबले होते. तेव्हा राज ठाकरे हेलिपॅड जवळच असलेल्या रिसॉर्टवर हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते.

हेही वाचा : Raj Thackeray News सारेगमप लिटल चॅम्प्स ज्ञानेश्वरी गाडगेने घेतली राज ठाकरेंसह शर्मिला ठाकरे यांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.