ETV Bharat / state

कोरोनाने मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवला; गुन्हा दाखल - कोरोनामृत पत्नीचा मृतदेहा हॉस्पिटलमधून पतीने पळवला

बीडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिली. तर पोलिसांनी पतीसह नातेवाईकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

beed
बीड
author img

By

Published : May 17, 2021, 6:33 PM IST

बीड - सर्वत्र कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातच बीडमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह पतीने रुग्णालयातून परस्पर पळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी डॉक्टर आणि नर्सच्या तक्रारीवरून पती व नातेवाईकांविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशापद्धतीने मृतदेह पळवण्याची बीड जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

'गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथील सुरवसे कुटुंबातील कोरोना पॉझिटिव्ह महिला गेल्या 28 दिवसापासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होती. उपचारादरम्यान संबंधित महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉक्टर आणि नर्स यांनी मृतदेह अंत्यविधीसाठी देता येणार नाही, असे सांगितले. तरीही कुठलीही काळजी न घेता, वैद्यकीय तपासणी न करता संबंधित कुटुंबिय महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन गावाकडे गेले', असे डॉक्टरांनी तक्रारीत नमूद केले आहे.

अतिरिक्त शल्य चिकित्सक सुखदेव राठोड

नजर चुकवून मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न

या महिलेचा आज (17 मे) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. मृत्यूनंतर डॉक्टर व नर्स यांची नजर चुकवून पती रुस्तुम सुरवसे यांनी व नातेवाईकांनी मयत पत्नीचा मृतदेह गाडीत टाकून पळवून नेला, अशी तक्रार नर्स अर्चना रामेश्वर पिंगळे यांनी दिली. या फिर्यादीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, कुठल्याही नातेवाईकांना मृतदेह घेऊन जाता येत नाही. यासाठी सुरक्षा वाढवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाला पत्र दिले आहे, असे अतिरिक्त शल्य चिकित्सक सुखदेव राठोड यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक : कोरोनामुळे 10 दिवसात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.