ETV Bharat / state

Maharashtra Politics: अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्या कानशिलात लगावल्याची दिली कबुली; मातोश्रीवरुन पदावरून हकालपट्टीचे दिले आदेश - शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव

बीडचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्या थोबाडीत लगावल्याचा दावा केला होता. त्यानंतर मातोश्रीवरुन अप्पासाहेब जाधव यांच्या हकालपट्टीचे आदेश निघाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच बीडमध्ये शिवसेना गटात राडा झाला आहे.

Maharashtra Politics
अप्पासाहेब जाधव
author img

By

Published : May 19, 2023, 9:56 AM IST

Updated : May 19, 2023, 10:41 AM IST

स्वाभीमानानेच मी पक्षासाठी काम करणार- अप्पासाहेब जाधव

बीड : राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटामध्ये विविध ठिकाणी मेळावे, बैठक त्याचबरोबर महाप्रबोधन यात्रा देखील होत असल्याचे आपण पाहत आहोत. येत्या 20 तारखेला बीडमध्ये होत असणाऱ्या महाप्रबोधन यात्रेपूर्वीच शिवसेना ठाकरे गटात राडा झाला आहे. जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्यात हाणामारीपर्यंतचा वाद झाल्याचे समोर आले आहे. मात्र त्यानंतर आता एक धक्कादायक अन खळबळजनक माहिती समोर आली आहे.

गणेश वरेकर सोबत बाचाबाची : शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव आणि उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यातील मारहाणीवर शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी आपली भुमिका मांडली आहे. ते म्हणाले शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, या जो पैसे देईल त्यांना पद वाटत सुटल्या होत्या. माझे पद देखील त्या विकायला निघाल्या आहेत. आम्ही इथे जिल्हाप्रमुख आहोत. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन पद द्या, असे मी त्यांना सांगत होतो. त्यावेळी गणेश वरेकर आणि माझ्यात बाचाबाची झाली. यात मी सुषमा अंधारे यांना देखील एक कानाखाली ठेवून दिली’ अशी स्पष्ट माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी व्हिडिओ करून दिली आहे.

स्कॉर्पिओ गाडी फोडली : मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे मी स्वाभीमानानेच पक्षासाठी काम करणार. मला अशा प्रकारचा अन्याय सहन होत नाही. त्यांचा सगळा प्रकार अति झालेला असल्यानेच नाईलाज झाल्याचे अप्पासाहेब जाधव म्हणाले आहेत. या प्रकारानंतर अप्पासाहेब जाधव आणि गणेश वरेकर यांच्यात बाचाबाची झाली. त्यात वरेकर यांनी अप्पासाहेब जाधव यांची स्कॉर्पिओ गाडी फोडली असल्याची माहिती मिळत आहे.

काय म्हणतात सुषमा अंधारे : दरम्यान शिंदे गटाकडून काहीतरी प्लॅन झालेला दिसत आहे. असा काहीही प्रकार झालेला नाही. मला मारहाण झाली असती तर त्यांच्यावर मी केस केली असती. पण ते जे सांगत आहेत ती माहिती खोटी आहे. असे स्पष्टीकरण सुषमा अंधारे यांनी दिले आहे.

मला मारहाण काही झाली असती, तर ते जिवंत परत गेले असते का? मी आता महाप्रबोधन यात्रेवर फोकस करत आहे. अप्पासाहेब यांनी कोणाला तरी काही काम सांगितले. त्यानंतर त्यावरून दोघांचे काहीतरी टोकाचे भांडण झाले. त्या भांडणात मला मारहाण झाली, वगैरे ही माहिती चुकीची आहे-सुषमा अंधारे

हेही वाचा :

  1. J P Nadda Pune Visit: मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर 'हे' नाव एकत्र कोणी घेत नाही - जे पी नड्डा
  2. Karnataka CM : कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला ममता, नितीश, केसीआर यांना निमंत्रण
  3. BJP On Dalit Votes : येणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपची मोर्चेबांधणी; आता दलित मतांवर नजर?

Last Updated : May 19, 2023, 10:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.