बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील कोळगावात बनावट दारू ( fake alcohol ) तयार करण्यासाठी चक्क स्पिरिटचे टँकर पकडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्कने या टँकरवर राज्य उत्पादन शुल्काची करडी नजर ( State Excise Eye on Tankers ) ठेवली होती. हे टँकर त्या ठिकाणी पोचल्यानंतर काही वेळातच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी त्या ठिकाणी जाऊन 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गाडी क्रमांक MH 17 BY 7251 या गाडी त विपक्रम मध्यार्क स्पिरीट 35 लाख 88 हजार रुपयांचा मध्यमाल राज्य उत्पादन शुल्क यांनी पकडला आहे.
30 हजार 680 लिटर स्पिरीट आढळून आले : यामध्ये तीन व्यक्तींना अटक केले आहे. त्यामध्ये श्रीराम सखाराम घाडगे, शहादेव वसंत धांडे राहणार खांबा तालुका शिरुर, संतोष अर्जुन शिंदे राहणार कोळगाव तालुका गेवराई असे असुन श्रीराम घाडगे यांचे कोळगाव परिसरात गिरिजा नावाचे हाॅटेल आहे. या हाॅटेलवर टॅंकर दिसून आले. त्यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी त्यांची तपासणी केली असता त्यामध्ये 30 हजार 680 लिटर स्पिरीट आढळून आले आहे.
मद्यपी मोठ्या प्रमाणात दारू पिऊन प्रचाराच्या कामाला : सध्या बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुमधडाका चालू आहे आणि याच अनुषंगाने मद्यपी मोठ्या प्रमाणात दारू पिऊन प्रचाराच्या कामाला लागतात यामध्ये अनेक जण दारूसाठी देखील मतदान करताना पाहायला मिळतात. मात्र ही दारू खरंच पिना योग्य आहे का हा देखील शोधाचा प्रकार आहे. मात्र फुकट दारू मिळाल्याने येणारा मागेपुढे पाहू नाही मिळेल तितकी दारू पिऊन नेत्याचा प्रचार करण्यासाठी सज्ज होते. मात्र ही दारू आता तुमच्या जीव देखील घेऊ शकते याचाच प्रत्यय आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या कामाला लागला : ग्रामपंचायत निवडणुकीच्या धुमधडाक्यात मुळे दारूचा सुळसुळाट होणार आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात बनावट दारू हे मार्केटमध्ये लोक येतील आणि याच्यात जीव देखील गमावतील यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सध्या कामाला लागला आहे. याच कामामध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात कोळगाव येथील काही महाभागाने बनावट दारूसाठी काही टँकर मागवले होते. ते टॅंकर जप्त करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात मिळालेल्या टँकरचा साठा पाहून किती लोकांचा जीव जाऊ शकतो. याचा अंदाज लावू शकतो मात्र हे टँकर मागणारे आरोपी श्रीराम श्रीराम सखाराम घाडगे शहादेव वसंत धांडे दोघेही राहणार खामगाव लिंबा तालुका शिरूर तर संतोष अर्जुन शिंदे हा कोळगावचा रहिवासी आहे. यांनी मिळून गंगाखेड ऊन बनावट दारू तयार करण्यासाठी हे टँकर मागवलेले असल्याचा पुढे आले आहे.
मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात स्पिरिटचा साठा : एका एजंट म्हणजेच शहादेव धोंडे यांच्यामार्फत एका टँकर मध्ये बनावट स्पिरिट मागवले असल्याने याचा सुगावा राज्य उत्पादन शुल्क विभागाला लागल्याने दहा तारखेला या विभागाने सापळा रचून जवळपास 30 हजार 680 लिटर असा स्पिरिटचा टँकर ज्याची किंमत पस्तीस लाख 88 हजार 250 इतकी आहे. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात मागणाऱ्या या तिघा आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्यात आला आहे. न्यायालयाने देखील त्यांना कोठडी देत कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. मात्र ही दारू कुठे बनणार होती इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात स्पिरिटचा साठा येतोय तर या मागचे जे मोठे रॅकेट आहे, ते पुढे येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मात्र वेळीच नागरिकांनी सतर्क होऊन या बनावट दारूपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी कोणतीही दारू खात्रीलायक नसल्याने या दारूपासून ग्रामीण भागातील नागरिकांनी सावध राहण्याचे इशारा राज्य शुल्क विभागाने दिला आहे. ही बनावट दारू नक्कीच एखाद्याचा शंभर टक्के जीव घेऊ शकते. यासाठी या दारूपासून लांबच राहणे गरजेचे आता यापुढे नागरिकांवरच धुरा आहे दारू प्यायची की नाही.