ETV Bharat / state

पंकजा मुंडे यांचा आदेश आला म्हणून अर्ज मागे घेतला -सुरेश धस

author img

By

Published : Oct 8, 2019, 12:34 PM IST

पंकजा मुंडे यांचा आदेश आल्यामुळे जयदत्त धस यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचे सुरेश धस यांनी सांगितले. आष्टी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता.

आमदार सुरेश धस

बीड - जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार सरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस यांनी आष्टी विधासभा मतदारसंघात भीमराव धोंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जयदत्त धस यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश आला म्हणून मी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले.

आमदार सुरेश धस

हेह वाचा - परळी विधानसभा : धनंजय मुंडेंकडून रोजगार निर्मिती, तर पंकजांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर

बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने आष्टी विधानसभा मतदारसंघात भीमराव धोंडे यांना आमदार उमेदवारी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत धस यांची उमेदवारी भाजपच्या धोंडे यांना भारी ठरली असती. जयदत्त धस यांचा उमेदवारी अर्ज ठेवायचा की, मागे घ्यायचा यासंदर्भात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाली. या बैठकीतच मंत्री पंकजा मुंडे यांचा सुरेश धस यांना फोन आला व अर्ज मागे घेण्याबाबत आदेश दिला. 'पंकजा मुंडे यांचा आदेश आहे म्हणूनच मी अर्ज मागे घेत आहे' असे जाहीरपणे आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. येणाऱ्या प्रचाराच्या काळात एकाही कार्यकर्त्याने पक्ष अथवा भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्याविरोधात काम करू नये, असे आदेशही कार्यकर्त्यांना सुरेश धस यांनी यावेळी दिले. आष्टी विधानसभा मतदारसंघात एकूण 25 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये 16 जणांनी माघार घेतली असून 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

हेही वाचा - एवढी आहे परळीच्या मुंडे बहीण-भावांची संपत्ती

धस-धोंडे संघर्ष अटळ -

आष्टी विधानसभा मतदारसंघात आमदार धोंडे व आमदार धस यांचा संघर्ष कायम असल्याचे संकेत सोमवारी मिळाले. भाजपने विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असतानाही सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर चिरंजीव जयदत्त धस यांची उमेदवारी दाखल केली होती. अखेर या सगळ्या नाट्यमय घडामोडीमध्ये मंत्री पंकजा मुंडे यांना हस्तक्षेप करून सुरेश धस यांना त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा अर्ज मागे घेण्यासाठी सांगावे लागले. यामुळे येणाऱ्या काळात धोंडे-धस संघर्ष अटळ आहे.

Intro:पंकजा मुंडे यांचा आदेश आला म्हणून अर्ज मागे घेतला- आ. सुरेश धस

बीड- बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी भाजपचे आष्टी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी जयदत्त धस यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा आदेश आला म्हणून मी माझ्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिले.

बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आष्टी विधानसभा मतदारसंघात भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त धस यांनी अष्ट विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपने आष्टी विधानसभा मतदारसंघात भीमराव धोंडे यांना आमदार उमेदवारी जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत धस यांची उमेदवारी भाजपच्या धोंडे यांना भारी ठरली असती. जयदत्त धस यांचा उमेदवारी अर्ज ठेवायचा की, मागे घ्यायचा यासंदर्भात कार्यकर्त्यांची व्यापक बैठक झाली. या बैठकीतच मंत्री पंकजा मुंडे यांचा सुरेश धस यांना फोन आला व अर्ज मागे घेण्याबाबत आदेश दिला. 'पंकजा मुंडे यांचा आदेश आहे म्हणूनच मी अर्ज मागे घेत आहे' असे जाहीरपणे आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. येणाऱ्या प्रचाराच्या काळात एकाही कार्यकर्त्याने पक्ष अथवा भाजपचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्याविरोधात काम करू नये, असे आदेशही कार्यकर्त्यांना सुरेश धस यांनी यावेळी दिले. आष्टी विधानसभा मतदारसंघात एकूण 25 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये 16 जणांनी माघार घेतली असून 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

धस -धोंडे संघर्ष अटळ-

आष्टी विधानसभा मतदारसंघात आमदार धोंडे व आमदार धस यांचा संघर्ष कायम असल्याचे संकेत सोमवारी मिळाले. भाजपने विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. असे असतानाही आ. सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर चिरंजीव जयदत्त धस यांची उमेदवारी दाखल केली होती. अखेर या सगळ्या नाट्यमय घडामोडी मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांना हस्तक्षेप करून सुरेश धस यांना त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा अर्ज मागे घेण्यासाठी सांगावे लागले. यामुळे येणाऱ्या काळात धोंडे-धस संघर्ष अटळ आहे.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.