ETV Bharat / state

वरणाच्या पातेल्यात पडल्याने पहिलीत शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी - student injured after fall in hot food

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये जवळबन येथे गरम वरणाच्या पातेल्यात पडून विद्यार्थी गंभीर भाजल्याची घटना घडील आहे. या विद्यार्थ्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

student injured after fall in an instrument with hot food
वरणाच्या पातेल्यात पडल्याने विद्यार्थी गंभीर जखमी
author img

By

Published : Nov 26, 2019, 9:02 PM IST

बीड - जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये जवळबन येथे गरम वरणाच्या पातेल्यात पडून पहिलीच्या वर्गातील विद्यार्थी गंभीर भाजल्याची घटना मंगळवारी घडली आहे. भाजलेला विद्यार्थी खिचडी शिजवून देणाऱ्या महिलेचाच मुलगा आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, जवळबन येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खिचडी शिजवून देण्याचे काम सुलोचना आश्रुबा करपे या जून २०१९ पासून करत आहेत. याच शाळेत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा वेदांत आश्रुबा करपे हा इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी दुपारी शाळेची पहिली सुट्टी झाल्यानंतर तो स्वयंपाकघरातील आईस भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याची आई शाळेतील स्वयंपाकघराच्या दारात उभी असल्याने वेदांत याने स्वयंपाकघरात झाकून ठेवलेल्या वरणाच्या पातेल्यावरील झाकणावर बसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पातेल्यावरील झाकण सरकल्याने वेदांत करपे याचा कमरेचा भाग वरणाच्या गरम पातेल्यात पडल्याने त्याच्या कमरेस व छातीस भाजले. त्याला तातडीने शाळेतील सहशिक्षक ज्योतिर्लिंग कळेकर व प्रवीण भिसे व शाळेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी त्यांच्या गाडीतून उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केज येथील गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनीही अंबाजोगाई येथे जाऊन जखमी वेदांत करपे यांची भेट घेतली.

Intro:वरणाच्या पातेल्यात पडल्याने पाहिलीचा विद्यार्थी गंभीर जखमी

बीड- जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये जवळबन येथे गरम वारणाच्या पातेल्यात पडूनपहिलीच्या वर्गातील विद्यार्थी गंभीर भाजल्याची घटना घडली मंगळवार रोजी आहे. भाजलेल्या विद्यार्थी खिचडी शिजवून देणाऱ्या महिलेचाच मुलगा आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, जवळबन येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना खिचडी शिजवून देण्याचे काम सुलोचना आश्रुबा करपे या जून २०१९ पासून करत आहेत. याच शाळेत त्यांचा सहा वर्षांचा मुलगा वेदांत आश्रुबा करपे हा इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत आहे. मंगळवारी दुपारी शाळेची पहिली सुट्टी झाल्यानंतर तो स्वयंपाकघरातील आईस भेटण्यास गेला होता. यावेळी त्याची आई शाळेतील स्वयंपाकघराच्या दारात उभी असल्याने वेदांत याने स्वयंपाकघरात झाकून ठेवलेल्या वरणाच्या पातेल्यावरील झाकणावर बसण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पातेल्यावरील झाकण सरकल्याने वेदांत करपे याचा कमरेचा भाग वरणाच्या गरम पातेल्यात पडल्याने त्याच्या कमरेस व छातीस भाजल्याने त्यास तातडीने शाळेतील सहशिक्षक ज्योतिर्लिंग कळेकर व प्रवीण भिसे व शाळेचे मुख्याध्यापक कांबळे यांनी त्यांच्या गाडीतून उपचारांसाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच केज येथील गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनीही अंबाजोगाई येथे जाऊन जखमी वेदांत करपे यांची भेट घेतली. Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.