ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे बीड शहरातील रस्ते निर्मनुष्य; पोलिसांचा कडक बंदोबस्त - बीड लेटेस्ट कोरोना अपडेट

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र होते, त्यामुळे प्रशासनाने काहिसा सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र, आता कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. बीडमध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे.

Beed Corona lockdown
बीड कोरोना लॉकडाऊन
author img

By

Published : Mar 26, 2021, 12:05 PM IST

बीड - जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी दहा दिवसाचे कडक लॉकडाऊन लागू केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर वाहने, दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद ठेवल्या आहेत. बीड शहरात व जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. जिल्ह्यात दोन हजारांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रूग्ण उपचार घेत आहेत. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवस म्हणजे चार एप्रिलपर्यंत लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.

लॉकडाऊनमुळे बीड शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे

बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा रेट 13 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. दिवसाला ३०० ते ३५० कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात चार एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. सकाळच्या सत्रात केवळ तीन तास भाजीपाला व अत्यावश्यक वस्तू विक्रीसाठी परवानगी दिलेली आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. पोलीस स्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांचे ओळखपत्र तपासत आहेत.

कोरोनाचे 2 हजारपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण -

एकूण दोन हजारपेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या कोविड सेंटर्सवर उपचार घेत आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा दर 13 टक्के इतका आहे. ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काम सुरू केले आहे. पुढील दहा दिवस नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत असे, आवाहन बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.