बीड : सोमेश्वर मंदिर हे गेली 200 वर्षों पुर्वीचे जुने मंदिर आहे. याला पुर्वीच्या काळी महादेव मळा म्हणून ओळखले जात होते. बीड शहरासह परिसरातील लोकांचे ग्रामदैवत म्हणून सोमेश्वर मंदिराला ओळखले जाते. ग्रामीण भागासह शहरातील लोक सोमवारी शनिवारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मनोभावे दर्शन घेतात.
सोमेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य : ज्यावेळेस मुक्ताबाई विठ्ठलाच्या भेटीला जातात तेव्हा त्या वाटेमध्ये चंपावती नगरीमध्ये थांबतात. चंपावती नगरीत बिंदुसरा नदीच्या काठावर एका खोल खड्ड्यामध्ये महादेवाची पिंड मुक्ताबाईच्या निदर्शनास आली. मुक्ताबाईंनी रात्री या ठिकाणी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या महादेवाला पाणी घातले. मग या पिंडीचे नाव काय ठेवायचे असा विचार पडला होता. तेव्हा पिंड सोमेश्वर महादेवाची आहे म्हणून याला सोमेश्वर महादेव व महादेव मळा असे संबोधले गेले.
सोमेश्वर मंदिर नाव : मंदिर अध्यक्ष नवनाथ शिराळे सांगतात की, या मंदिराला सोमेश्वर मंदिर नावाने ओळखले गेले या सोमेश्वर मंदिराचे सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे ज्या वेळेस पंढरपूरला जाण्यासाठी गजानन महाराजांची पालखी असेल किंवा मग मुक्ताबाईची पालखी असेल या सर्व पालख्या सह पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी या सोमेश्वर महादेवाचे दर्शन घेतात. मुक्ताईची व गजानन महाराजांची पालखी बीड शहरांमध्ये आल्यानंतर श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. अनेक वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही कायम आहे. कधीकाळी माहित नाही पण विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा प्रत्येक वारकरी श्री सोमेश्वराचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. त्यामुळे या सोमेश्वर मंदिराला महत्त्वाचे स्थान दिले जाते. विशेष म्हणजे या मंदिराचे बांधकाम कधी झाले आहे हे माहीत नव्हते. परंतु ते दगडी बांधकाम पुरातन होते. ते पडल्यामुळे आम्ही सर्व बीड शहरातील भाविकांनी मिळून या मंदिराचा जिर्णोद्धार केला. आज हे प्रशस्त सोमेश्वर मंदिर आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नतमस्तक झाल्यानंतर आपण जे वरदान श्री शंभू महादेवाला महागाल ते या ठिकाणी शंभू महादेव मोठ्या मनाने देतात.
मनाला समाधान वाटते : बीडच्या काठोडा या गावात राहणारे भक्त डाके शहादेव आसाराम सांगतात की, या ठिकाणी गेल्या 20 वर्षापासून दर्शनाला नित्य नियमाने येतो जर या मंदिरामध्ये दर्शनासाठी नाही आलो, तर मला चैन पडत नाही. त्याचबरोबर या ठिकाणी आल्यानंतर मनाला समाधान वाटते. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर देवाचे दर्शन घेतल्यानंतर मन प्रसन्न होते, असे डाके शहादेव आसाराम म्हणतात.
महादेव प्रसन्न झाले : शंकर बायस म्हणतात की, मी गेले 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी महादेवाची सेवा करतो. मला हे महादेव प्रसन्न झालेले आहेत. महादेवाने माझ्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण केलेल्या आहेत. दररोज पाच वाजता सकाळी दर्शनासाठी येत असतो. जर माझे या ठिकाणी येणे झाले नाही तर मला चुकल्यासारखे वाटते. मला दिवसभर करमत नाही. या ठिकाणी सोमवारी तर मोठ्या प्रमाणात गर्दी असते परंतु दररोज ही गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, असे शंकर बायस सांगतात.
नागरिकांची इच्छा पूर्ण करो : या ठिकाणी आल्यानंतर सोमेश्वर महादेवाची सेवा मी मनोभावे करते. देवाला अशी प्रार्थना करते की या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची इच्छा पूर्ण करो असे शंभू महादेव भक्त लता कुडके या म्हटल्या आहेत. या भोलेनाथाच्या मंदिरात गेले 30 वर्षी पासून येत आहे. मला भोलेनाथाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी येणे आवडते. माझे वय आज 50 आहे, मात्र गेल्या अनेक दिवसापासून मी या ठिकाणी सेवा करत आहे.