ETV Bharat / state

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून सौर ऊर्जेच्या बॅटऱ्यांची चोरी - बीड जिल्हाधिकारी कार्यालय

बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सौर ऊर्जा प्लांटच्या कामासाठी ठेवलेल्या बॅटरी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून सौर ऊर्जेच्या बॅटऱ्यांची चोरी
author img

By

Published : Jul 4, 2019, 9:54 PM IST

बीड - जिल्हाधिकारी कार्यालयातील सौर ऊर्जेच्या बॅटरीज चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. सौर ऊर्जेचे काम दिलेल्या संबंधित कंपनीचे कर्मचारी गुरुवारी बॅटर्‍यांची तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी ४ ते ५ बॅटऱ्या नसल्याचे निदर्शनास आले आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून सौर ऊर्जेच्या बॅटऱ्यांची चोरी

जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाची वीज खंडित झाल्यानंतर सौर ऊर्जेद्वारे तयार केलेली वीज वापरता यावी, या उद्देशाने सौरऊर्जेचा महत्त्वाचा प्लांट तयार केलेला आहे. गेल्या काही दिवसापासून हा प्लांट कार्यान्वित केला नव्हता. हा प्लांट सुरू करण्यासाठी आज संबंधीत कंपनीचे कर्मचारी आले होते. त्यावेळी त्यांना सौर ऊर्जेच्या ४ ते ५ बॅटरीज नसल्याचे दिसले. याबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात येणार आहे. तसेच तत्काळ कारवाई करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अशाप्रकारे चोरी होणे गंभीर बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या विभागातील अनेक महत्त्वाच्या फाइल असतात. मात्र, या कार्यालयातून बॅटरीज चोरीला जातात म्हटल्यावर महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्या तर नवल वाटू नये. आता याप्रकरणी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Intro:अबब... चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी; सौर ऊर्जेच्या बॅटरी पळवल्या चोरांनी

बीड- चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातील सौर ऊर्जेच्या बॅटरी चोरीला गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी समोर आली आहे. ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे महत्त्वाच्या फाइल्स असतात त्याच कार्यालयात अशाप्रकारे सौर ऊर्जेच्या बॅटर्‍यांची चोरी होणे गंभीर बाब आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. गुरुवारी सौर ऊर्जेचे काम दिलेल्या संबंधित कंपनीचे कर्मचारी बॅटर्‍यांची तपासणी करण्यासाठी आले होते. यावेळी 4 ते 5 बॅटरी नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्याने निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे.

Body:बीड जिल्हाधिकारी कार्यालयात वेगवेगळ्या विभागातील अनेक महत्त्वाच्या फाइल असतात. जिल्हाधिकारी कार्यालयातून बॅटरी चोरीला जातात म्हटल्यावर महत्त्वाच्या फाईल चोरीला गेल्या तर नवल वाटू नये, अशी परिस्थिती बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाची वीज खंडित झाल्यानंतर सौर ऊर्जेची वीज वापरता यावे या उद्देशाने सौरऊर्जेचा महत्त्वाचा प्लांट तयार केलेला आहे. मागील काही दिवसापासून हा प्लांट कार्यान्वित करण्याचे राहून गेले होते. गुरुवारी संबंधित कंपनीचे कर्मचारी सौर ऊर्जेचा प्लांट सुरू करण्यासाठी आले असता त्यांना सौर ऊर्जेच्या चार ते पाच बॅटरी चोरीला गेल्या असल्याचे निदर्शनास आले याबाबत पत्र देखील संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना दिले आहे. आम्ही याबाबत तात्काळ कारवाई करणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी सांगितले आहे.

Conclusion:बीड जिल्हाधिकारी कार्यालयात अशाप्रकारे चोरी होणे गंभीर बाब आहे. सौर ऊर्जेच्या बॅटरी चोरी प्रकरणाचा छडा लावण्यासाठी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.