बीड - सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी सायंकाळी बीडवरून आढावा बैठक संपवून परळीकडे निघाले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यासमोर तेलगावजवळ दोन टेम्पोंचा अपघात झाला. तेव्हा धनंजय मुंडे यांनी स्वतः गाडीच्या बाहेर येत अपघातग्रस्तांची विचारपूस केली. इतकेच नव्हे तर, जखमींना मुंडे यांनी आपल्या ताफ्यातील एक वाहन देत, जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत केली.
हेही वाचा... 'उपमुख्यमंत्र्यांच्या भल्या सकाळच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची दमछाक'
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, हे सध्या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी ते एक आढावा बैठक आटपून परळीकडे चालले होते. तेव्हा तेलगावजवळच त्यांच्या समोर दोन टेम्पोंचा अपघात झाला. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचा ताफा थांबवून अपघातग्रस्तांची विचारपूस केली. तसेच जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आपल्या ताफ्यातील वाहन देऊ केले. मुंडे यांच्या जाण्यानंतर त्यांच्या या कृतीची मोठी चर्चा होत होती.
यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून येणाऱ्या पोलिसांच्या एका वाहनाला अपघात झाला होता. त्यावेळीही त्यांनी अशा प्रकारे मदत केली होती.
हेही वाचा... बारामतीत अजित पवारांचे जंगी स्वागत, ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक