ETV Bharat / state

पूजा चव्हाण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा; सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांची मागणी - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण लेटेस्ट अपडेट

पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा कथितरित्या संबंध असल्याचे आरोप होत आहेत. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे.

Shantabai Rathore
शांताबाई राठोड
author img

By

Published : Feb 15, 2021, 12:50 PM IST

Updated : Feb 15, 2021, 4:49 PM IST

बीड - परळी येथील पूजा चव्हाण या तरूणीच्या आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज असणाऱ्या अरुण राठोड व विलास चव्हाण यांना पोलीस अटक का करत नाहीत? असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता शांताबाई राठोड यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली

पोलिसांनी 'त्या' दोघांचा शोध घ्यावा -

राज्यात पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपमधील संवाद साधणारे अरुण राठोड व विलास चव्हाण अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नाहीत. पूजावर अन्याय झाला आहे. तिचे कुटुंब दुःखात आहे. आम्ही सातत्याने ओरडून-ओरडून पूजाला न्याय देण्याची मागणी करत आहोत. पोलिसांनी त्या ऑडिओ क्लिपमध्ये संवाद साधणाऱ्या दोन्ही मुलांना अटक करून सखोल चौकशी करावी, अशी आमची मागणी असल्याचे शांताबाई राठोड यांनी सांगितले.

अन्यथा मंत्रालयात उपोषणाला बसणार -

जर या सरकारने पूजा चव्हाणला न्याय दिला नाही तर आम्ही या सरकारच्या विरोधात थेट मंत्रालयात आंदोलन सुरू करू, असा इशाराही सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई राठोड यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण -

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.

Last Updated : Feb 15, 2021, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.