ETV Bharat / state

बीडमध्ये युवा शेतकऱ्याने ७० दिवसात टरबुज पिकातून घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न - Beed watermelon farm news

बीडमध्ये एका तरुण शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना बगल देत टरबुजाचे पीक घेतले. एका एकरात त्याने १,३६,००० रुपयांचे उत्पन्न घेतले. कोरोनामुळे नोकरी सोडून तो गावी आला. यानंतर त्याने हे पीक घेतले. शंकर सोळंके असे आमला येथील शेतकऱ्याचे नाव आहे.

Beed
Beed
author img

By

Published : Apr 25, 2021, 1:46 PM IST

बीड : परळी तालुक्यातील सिरसाळा पासून जवळच असलेल्या आमला (ता.धारूर) येथील शंकर जिजाभाऊ सोळंके याने कोरोना काळात धाडस करून टरबुजाची लागवड केली. हा युवा शेतकरी गेले पाच वर्षे एका खासगी कंपनीत पुण्याला कामाला होता. परंतु कोरोना काळात तो पुण्यातील काम सोडून मूळ गावी आला. आता काय करावे या विवंचनेत असताना डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी प्रवीण सोळंके सर यांच्या सल्यानुसार हलक्या व मुरमाड शेतीमध्ये बदल करीत टरबूज या पिकावर आपले लक्ष केंद्रित केले. आता भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे. पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. मात्र आजच्या तरुणाईला हे गणित न पटणारे आहे. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे. तरुण शेतकरी शंकर सोळंकेने ते करून दाखवले आहे.

कमी पाण्यावर मिरची या पिकात धाडस करून ३ पॅकेट (३००० बियांची) टरबूज लागवड केली. यातून १६ टन टरबूज पिकाचे उत्पन्न घेतले आहे. किलोला ८.५० रुपये असा भाव मिळाला. एकूण १,३६,००० रुपये मिळाले. खर्च ३४,००० रुपये जाता ७० दिवसात १०२००० रुपये निव्वळ नफा मिळाला आहे. विशेष म्हणजे हे सारे उत्पन्न केवळ एका एकरात घेतले आहे. तरी परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्याने नवा आदर्श निर्माण केला आहे. या भागात प्रामुख्याने कांदा, गहू, मिरची, ऊस, मका ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो. पण सोळंकेने टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले.

सोळंकेने सहा बाय दीड फूट अंतरावर सरी तयार केली. त्यावर ड्रीप, मल्चिंग पेपर टाकून टाकली. त्यावर उच्चप्रतीच्या टरबुजाच्या बिया टोचल्या. डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीच्या (जर्मिनेटर, प्रिझम, क्राप शाइनर, राइपनर, न्युट्राटोन) औषधांचा उत्पादनावर चांगला परिणाम झाला. टरबूज व मिरची या पिकांची लागवड केली. पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही, त्यामुळे आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केल्याने आर्थिक नियोजनही चांगले होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कोरोना काळात काय करावे? या विवंचनेत असताना मला शेती शेत्रात या पिकातून चांगल्या प्रकारे भरघोस नफा मिळाला. युवा पिढीने पारंपरिक शेतीला वेगळे वळण देऊन भरघोस उत्पादन घ्यावे, असे शंकर सोळंके याने म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.