ETV Bharat / state

बीडमध्ये सापडले चक्क विमानाचे अवशेष, २०१३ मध्ये सापडला होता विमानाचा फॅन

तलावातील गाळ काढताना ७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना अवशेष सापडले आहेत.

७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष
author img

By

Published : Jun 1, 2019, 4:31 PM IST

Updated : Jun 1, 2019, 8:47 PM IST

बीड - तलावातील गाळ काढताना ७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील रूटी मध्यम प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे. हे काम चालू असताना अवशेष सापडले आहेत. यापूर्वी २०१३ सालीही येथे विमानाचा पंखा सापडला होता.

७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष

अवशेष सापडलेले विमान हे सेनादलाचे असून, १९४५ मध्ये भरकटले होते. विमान 'इमर्जन्सी लँडिंग' साठी या प्रकल्पात पाडावे लागले होते. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला होता. तर दुसरा पोहत पाण्याबाहेर आला होता. अशी माहिती आष्टी तालुक्यातील लोकांनी सांगितली आहे.

beed
७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष

तब्बल ७४ वर्षापूर्वी रोटी प्रकल्पात कोसळलेल्या या विमानाचे अवशेष गाळ काढताना सापडल्याने रूटी प्रकल्पाच्या भोवती राहणाऱ्या जुन्या व वयोवृद्ध नागरिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. ७४ वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 दरम्यान हे विमान रोटी प्रकल्पात कोसळले होते. तेव्हा त्यातील एक सैनिक बचावला होता. त्या सैनिकाला येथील ग्रामस्थ रामराव पाटील जासूद यांनी आपल्या बैलगाडीतून दवाखान्यात नेले होते.

beed
७४ वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष

१६ बैलगाड्या लावून विमान बाहेर काढण्याचा प्रयत्‍न-

१९४७ दरम्यान आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. अशा परिस्थितीत रूटी प्रकल्पाभोवती राहणाऱ्या नागरिकांनी 16 बैलगाड्या लावून मोठे विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न करणार्‍यांमध्ये वसंत अष्टेकर व मुबारक चाऊस या दोघांचा समावेश होता. मात्र, तेव्हा ते विमान बाहेर काढण्यास अपयश आले होते.

Intro:बीड मध्ये तलावातील गाळ काढताना 74 वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे सापडले अवशेष बीड- जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या रूटी मध्यम प्रकल्प दुष्काळामुळे कोरडा ठाक पडला आहे. त्या प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरू असतानाच 74 वर्षापूर्वी कोसळलेल्या विमानाचे अवशेष सापडले. यापूर्वी 2013 च्या दुष्काळात रुटी प्रकल्पातील गाळ काढत होते. तेव्हा विमानाचा पंखा सापडला होता. यावर्षी गाळ काढत असताना संपूर्ण विमानाचा सांगाडा सापडला आहे. हे विमान सेनादलाचे असून 1945 मध्ये भरकटले होते. विमान 'इमर्जन्सी लँडिंग' साठी या प्रकल्पात पाडावे लागले होते. या घटनेत एक वैमानिक तलावात बुडाला तर दुसरा पाठीवर असलेल्या व्यक्ती पोहत पाण्याबाहेर आला होता. अशी माहिती आष्टी तालुक्यातील लोक सांगतात.

Body:तब्बल 74 वर्षापूर्वी रोटी प्रकल्पात कोसळलेल्या या विमानाचे अवशेष 2019 मध्ये गाळ काढताना सापडले अन आष्टी तालुक्यातील रूटी प्रकल्पाच्या भोवती राहणाऱ्या जुन्या व वयोवृद्ध नागरिकांच्या आठवणींना उजाळा मिळाला. 74 वर्षांपूर्वी म्हणजेच 1947 दरम्यान तेव्हा हे विमान रोटी प्रकल्पात कोसळले होते तेव्हा त्यातील एक जण जो बचावला होता त्या सैनिकाला येथील ग्रामस्थ रामराव पाटील जासूद यांनी त्या सैनिकाला बैलगाडीत म्हणून बैलगाडीतून दवाखान्यात नेले होत असल्याचेही जाणती मंडळी सांगते.

Conclusion:सोळा बैलगाड्या लावून केलेला विमान बाहेर काढण्याचा प्रयत्‍न- 1947 दरम्यान आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. अशा परिस्थितीत रूटी प्रकल्प भोवती राहणाऱ्या नागरिकांनी सोळा बैलगाड्या लावून मोठे चा नाडा हातात घेतला व विमान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न करणार्‍या मध्ये वसंत अष्टेकर व मुबारक चाऊस या दोघांचा समावेश होता. तो हातातला नाडा विमानाला बांधून विमान बाहेर काढण्याचा देखील प्रयत्न झाला होता मात्र तेव्हा ते विमान बाहेर काढण्यास अपयश आले होते. 74 वर्षांपूर्वीच्या या आठवणी सांगण्यासाठी काही मोजकीच माणसं आता आता उरले आहेत.
Last Updated : Jun 1, 2019, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.