ETV Bharat / state

बीड : रेमेडेसिवीरसह इतर औषधांवरील कर माफ करावा; संभाजी ब्रिगेडची मागणी - Sambhaji Brigade president Rahul Waikar

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर म्हणाले, की मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक गोरगरिबांच्या हाताचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यावर खर्च करत असताना महागडी औषधे व गोळ्या विकत घ्यावी लागत आहेत.

tax exemption from gov on medicines
औषधांवरील कर
author img

By

Published : Apr 27, 2021, 10:54 PM IST

बीड- संपूर्ण देशभरात मार्च 2020 पासून कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीरसह इतर औषधांवरील कर केंद्र व राज्य सरकारने कर माफ करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर म्हणाले, की मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक गोरगरिबांच्या हाताचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यावर खर्च करत असताना महागडी औषधे व गोळ्या विकत घ्यावी लागत आहेत. अनेक गोरगरिबांना तर महागड्या औषधांमुळे चांगले उपचार घेणे अशक्य होत आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रात मेडिसिनवर लावत असलेला कर माफ करावा. जेणेकरून नागरिकांना कमी खर्चात उपचार करणे शक्य होईल.

रेमेडेसिवीरसह इतर औषधांवरील कर माफ करावा

हेही वाचा-यवतमाळ : दारुची तल्लफ भागविण्याकरता सॅनिटायझर पिल्याने आणखी एकाचा मृत्यू

ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारावेत- संभाजी ब्रिगेड-

ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अनेक रुग्ण वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे बळी जात आहेत. अशा वातावरणामध्ये जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागात कोविड सेंटर उभारावेत, अशी मागणीही संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष वाईकर पुढे म्हणाले की, बीड जिल्ह्यात रेमडेसीवर इंजेक्शन तसेच ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनस्तरावरून विशेष प्रयत्न होणे अपेक्षित आहे. या मागण्यांचे निवदेन राहुल वाईकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे.

हेही वाचा-कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.