ETV Bharat / state

अंबेजोगाईतील स्वाराती रुग्णालयाला अद्ययावत रेडिओग्राफी मशीन होणार उपलब्ध - धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून 42.60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी 15 लाख रुपये किमतीची आणखी एक आरटीपीसीआर मशीन व दहा लाख रुपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेट देखील खरेदी करण्यात आले असून, या मशीन्स काल (शुक्रवारी) रात्री प्राप्त झाल्या आहेत.

स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई
स्वाराती रुग्णालय अंबाजोगाई
author img

By

Published : Apr 17, 2021, 4:49 PM IST

अंबेजोगाई (बीड) - अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयाला अद्ययावत डिजिटल एक्सरे (रेडिओग्राफी) मशिन्स आज (शनिवारी) प्राप्त होणार आहेत. या मशिनच्या खरेदीसाठी पालकमंत्री धनंजय मुंडेंनी जिल्हा वार्षिक विकास योजनेतून 42.60 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्याचप्रमाणे स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यासाठी 15 लाख रुपये किमतीची आणखी एक आरटीपीसीआर मशीन व दहा लाख रुपयांचे बायोसेफ्टी कॅबिनेटदेखील खरेदी करण्यात आले असून, या मशीन्स काल (शुक्रवारी) रात्री प्राप्त झाल्या आहेत. मागील आठवड्यात बीड येथे मुंडेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत स्वाराती ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी याबाबतची मागणी केली होती. ही मागणी एका आठवड्याच्या आत मार्गी लागल्याने डॉ. सुक्रे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

स्वाराती रुग्णालयातील एक्स-रे मशीन दहा वर्षे जुनी होती. त्यामुळे एक्स-रे बाबत अनेक तक्रारी होत्या. आता अद्ययावत डिजिटल रेडिओग्राफी मशिन्स उपलब्ध होत असल्यामुळे रुग्णांना काही मिनिटात एक्स-रे प्राप्त होणार आहेत. तसेच कोरोनासह अन्य रुग्णांना देखील लवकर उपचार मिळणार असल्याचा विश्वास डॉ. सुक्रे यांनी व्यक्त केला. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऑक्सिजन प्लांट स्वाराती येथे शिफ्ट करण्यात आला आहे. याद्वारे जवळपास 290 ते 300 जम्बो सिलेंडर लिक्विड ऑक्सिजन एका दिवसात निर्माण होईल. त्यामुळे स्वाराती मध्ये आणखी ऑक्सिजन बेड वाढविता येणार असून हा प्लांट उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, अशी माहिती डॉ. सुक्रे यांनी दिली आहे. तसेच स्वाराती मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार 150 बेड्स वाढविण्यात आले आहेत. परंतू आणखी 100 बेड्स वाढविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

256 स्लाईस सिटी स्कॅन मशीनचा प्रस्ताव पाठवला

पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात उपलब्ध असलेली अद्ययावत 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन स्वाराती ग्रामीण रुग्णालयात बसवावी. ग्रामीण भागातील रुग्णांना त्यासाठी मोठ्या शहरात जायला लागू नये, यासाठी धनंजय मुंडे यांनी 256 स्लाईस सिटी स्कॅन मशीन खरेदीचा प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा प्रस्ताव जिल्हा प्रशासनामार्फत राज्य शासनाला पाठवला आहे. आता ही मशीनकही लवकरच उपलब्ध करून देण्याचे आश्वासन धनंजय मुंडे यांनी दिले आहे, अशी माहिती डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.