बीड - शहरात शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बीड शहरातील विविध ठिकाणी सकल भागात पाणी साचले होते. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान -
शनिवारी दिवसभर ऊन होते. मात्र, सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला व ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यानंतर वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास धो-धो पाऊस सुरू होता. यामुळे बीड शहरातील विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, या पावसांने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक शेतकऱ्यांच्या ज्वारीचा कडबा भिजला. तसेच शेतकऱ्यांकडील गावरान आंब्याचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - गोवा शिपयार्डने बांधलेल्या 'आयसीजीएस सजग'चे अजित डोवाल यांच्या हस्ते लोकार्पण