ETV Bharat / state

'दोन थेंब जीवनाचे' पोलिओ निर्मूलन काळाची गरज - जिल्हा परिषद अध्यक्ष - परळी वैजनाथ घाटनांदूर लेटेस्ट न्यूज

घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण सुरू झाले. जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

परळी वैजनाथ घाटनांदूर लेटेस्ट न्यूज
परळी वैजनाथ घाटनांदूर लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Jan 31, 2021, 7:56 PM IST

परळी वैजनाथ /घाटनांदूर (बीड) - 'एखादे बालक, व्यक्ती दिव्यांग असेल तर, अनेकदा त्याला हिणवले जाते. मात्र, अनेकदा केवळ जनजागृती व समज नसल्यामुळे लसीकरण न केल्याने त्याला दिव्यांग आयुष्य जगावे लागत असते. हे टाळण्यासाठी लसीकरण अतिशय आवश्यक आहे,' असे बीड जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट म्हणाल्या.

घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी (ता. ३१) सकाळी साडेआठ वाजता पल्स पोलिओ लसीकरण सुरू झाले. त्या प्रसंगी सिरसाट अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

पुढे बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या सिरसाट म्हणाल्या की, 'भविष्यातील संभाव्य आजार टाळण्यासाठी गरोदर माता, बालक यांचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे असून आरोग्य विभागाप्रमाणेच नागरिक माता पालक यांनी सचेत राहिले पाहिजे. आजची बालके देशाचे भविष्य आहेत. ती सुदृढ राहिली तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल राहील, असे सांगत कोविड लसीकरणावेळीही कुठलीही शंका न घेता न भिता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा - अहमदनगर : जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम, शहरात ४६ हजार बालकांना डोस

सरपंच ज्ञानोबा जाधव, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र वालेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, माजी उपसरपंच प्रा. सुरेश जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष शेख मुक्तार, वैद्यकीय अधिकारी डॉ. माऊली मुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ विलास घोळवे आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. माऊली मुंडे, डॉ. विलास घोळवे, श्रीमती शेख, श्रीमती मस्के, श्रीमती गित्ते, श्रीमती वीर, प्रकाश जाधव, गणेश शिंदे, पाशाभाई पठाण, सर्व आशा स्वयंसेविका आदींनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा मुंडे यांनी मानले.

हेही वाचा - तीन राजे वेगळे आहेत कुठे, तिन्ही एकत्रच आहेत - छत्रपती संभाजीराजे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.