ETV Bharat / state

बीड : पोलीस कॉन्स्टेबलचा प्रामाणिकपणा; एक तोळे सोने केले परत

केज तालुक्यातील एका व्यक्तीचे सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे सुमारे पन्नास हजार रु किमतीचे दागिने हरवले होते. ते केज पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल यांना सापडले होते.

Police constable shows his honesty
पोलीस कॉन्स्टेबलचा प्रामाणिकपणा
author img

By

Published : Apr 25, 2021, 3:24 PM IST

केज (बीड) - येथील एक व्यक्तीचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिने एका पोलीस कॉन्स्टेबलने परत केल्यामुळे त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

केज तालुक्यातील एका व्यक्तीचे सोन्याचे दहा ग्रॅम वजनाचे सुमारे पन्नास हजार रु किमतीचे दागिने हरवले होते. ते केज पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल यांना सापडले होते. त्यानंतर काही वेळात एक व्यक्ती पोलीस ठाण्यात येऊन पोलीस ठाणे अंमलदार यांना आपल्या हरवल्याचे सोने हरवल्याची व्यथा सांगून रडू लागला आणि तपास करण्याबाबत विनंती करू लागला.

यानंतर या व्यक्तीची चौकशी करून त्याची ओळख पटवण्यात आली. तर हे दागिने त्याचेच असल्याची खात्री पटली. यानंतर त्याला ते दागिने पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली परत करण्यात आले.

दरम्यान, या घटनेमुुळेे पोलीस कॉन्स्टेबलच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.