ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दौऱ्यावर येण्याची शक्यता; ६ एप्रिलला अंबाजोगाईत सभा - munde

प्रीतम मुंडे यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अवघे ४ दिवस उरले आहेत.

मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये मोदी यांची प्रचारसभा नाकारली होती
author img

By

Published : Mar 22, 2019, 8:18 PM IST

बीड - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ६ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. भाजपच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान गोपीनाथ मुंडेंनी बीडमध्ये मोदी यांची प्रचारसभा नाकारली होती. यामुळे २०१४ च्या गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारतंत्राची आठवण बीडकरांना होत आहे.

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींची संपूर्ण देशात लाट होती. तरीदेखील बीडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा गोपीनाथ मुंडे यांनी नाकारली होती. जिल्ह्यात मुस्लीम वर्गदेखील त्यांचा मतदार होता. या मतदारांवर काही विपरित परिणाम होऊ नये, यासाठी त्यांनी मोदींची सभा नाकारल्याचे बोलले जाते. याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलून देखील दाखवले होते. मात्र, यावेळी प्रीतम मुंडेंच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी बीड जिल्हा दौऱ्यावर येण्याची शक्यता असून ते अंबाजोगाई येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Intro:खालील बातमी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा व नरेंद्र मोदी यांचा पासपोर्ट फोटो डेस्क च्या व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केला आहे..... याशिवाय बातमी बरोबर प्रीतम मुंडे यांचे संग्रहित फाईल फुटेज पाठवत आहे

††*********************

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी 2014 ला नाकारली होती नरेंद्र मोदींची सभा; आता ६ एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या बीड जिल्हा दोऱ्याची शक्यता

बीड- 2014 च्या बीड लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यावेळी नरेंद्र मोदींची संबंध देशात लाट होती. तरीदेखील बीडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा गोपीनाथ मुंडे यांनी नाकारली होती. याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले देखील होते. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मुस्लिम वर्गदेखील त्यांचा मतदार असायचा. 6 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता असून ते भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने 2014 च्या गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीची आठवण बीडकरांना होत आहे.

Body:भाजपकडून डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची बीड जिल्ह्यात दौऱ्यावर येण्याची शक्यता असून ते अंबाजोगाई येथे जाहीर सभा घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 2014 मध्ये बीड लोकसभा मतदारसंघात नरेंद्र मोदी यांची सभा गोपीनाथ मुंडे यांनी नाकारली होती. विशेष म्हणजे 2014 मध्ये सर्वत्र मोदी लाट असतानाही गोपीनाथ मुंडे यांना बीडमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सभेची गरज वाटली नव्हती. याबाबत त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलून देखील दाखवले होते. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात मुस्लिम मतदार देखील गोपीनाथ मुंडे यांचे चहाते असायचे एवढेच नाही तर मुस्लिम समाजाचे मतदान देखील गोपीनाथ मुंडे यांना मतदान करायचे, या मतदारांवर काही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बीड मधील 2014 ची नरेंद्र मोदी यांची सभा नाकारली होती. व ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होत. तेव्हा राष्ट्रवादीकडून सुरेश धस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

Conclusion:बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉक्टर प्रीतम मुंडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांची थेट लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्याशी होत आहे. लोकसभा निवडणुकी अर्ज दाखल करण्यासाठी अवघ्या चार दिवस उरले आहेत. या चार दिवसात सर्व प्रमुख पक्षाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.