परळी(बीड)- परळी नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वेतनासंबंधी सेवानिवृत्त कर्मचार्यांनी वारंवार निवेदन देवूनही सेवानिवृत्त कर्मचार्यांना अद्यापही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आमच्या रास्त मागण्या तात्काळ मंजुर कराव्यात अन्यथा ८ एप्रिल पासून परळी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करु. असा ईशारा परळी नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
अन्यथा उपोषण करु
सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या वेतनासंदर्भात नगर परिषद प्रशासनासोबत वारंवार बोलणी करून या पुर्वीही दोनदा आमरण उपोषण मागे घेण्यात आले. परंतु त्यानंतरही नगर परिषदेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. सेवानिवृत्त कर्मचार्यांचे दरमहा वेतन केले जात नसल्याने कर्मचार्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे सेवानिवृत्त कर्मचार्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदनात स्पष्ट केले आहे. जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ तीन महिन्यांचे वेतन ८ एप्रिल पूर्वी करावे. तसेच सेवानिवृत्त कर्मचार्यांचे थकीत वेतन, डी.ए., जी.पी.एल.ची थकबाकी रक्कम तात्काळ देण्यात यावे. अन्यथा ८ एप्रिल २०२१ पासून परळी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषण करु, असा ईशाराही सेवानिवृत्त कर्मचार्यांनी दिला आहे.
हेही वाचा-..तर विश्वासघातकी महाविकास आघाडी विरोधात रस्त्यावर उतरणार - राजू शेट्टी
हेही वाचा-मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात.. एकजुटीने लढू आणि जिंकू, मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन