बीड - दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जिल्ह्यात आज विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंकजा मुंडेंनी ट्विटरवर एक भावनिक कविता शेअर करत गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले आहे.
पंकजा मुंडेंनी आपल्या बाबांना अभिवादन करताना म्हटले आहे, की 'मायेची सावली हरवली.....सर्व मिळवता येतं पण ही सावली नसल्याने ऊन पोळत.... जग जिंकता येते पण पाठीवर थाप मारायला कोणीच नसतं...सदैव असचं वाटतं... काहीही मिळवलं तरी उणे, मुंडे साहेब हाती काही उरतचं नाही...आनंद छोटे आणि दुःख ठेंगणी आहेत बाबा तुमच्या शिवाय'.....या शब्दांनी जड अंतकरणाने पंकजा मुंडेंनी बाबा गोपीनाथ मुंडेंनी अभिवादन केले आहे.
गोपीनाथ मुंडेंच्या पुण्यतिथी निमित्त परळी तालुक्यातील गोपीनाथ गड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजित केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गोपानाथ गड येथे जाऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केले. मुख्यमंत्र्याबरोबरच विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री महादेव जानकर, खासदार रणजितसिंहत नाईक निंबाळकर, परभणीचे खासदार बंडू जाधव, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे यांनीही त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले.