ETV Bharat / state

मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय; माजी मंत्री पंकजा मुंडे - पंकजा मुंडे यांचा आरोप

मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नाही तर माझ्या साखर कारखान्याला कर्ज मिळणार नाही, याची खबरदारी विरोधकांकडून घेतली जात आहे. हे सगळे करणारे कोण आहे? त्यांचे नाव घेणार नाही, त्यांना जनताच धडा शिकवेल, असा टोला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.

बीड
बीड
author img

By

Published : Oct 22, 2020, 6:40 PM IST

Updated : Oct 22, 2020, 8:23 PM IST

बीड - माझ्या वेगवेगळ्या संस्थांमधील लोकांना अडचणीत आणले जात आहे. मला जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. एवढेच नाही तर माझ्या साखर कारखान्याला कर्ज मिळणार नाही, याची खबरदारी विरोधकांकडून घेतली जात आहे. हे सगळे करणारे कोण आहे? त्यांची नावे न घेता त्यांना जनताच धडा शिकवेल, असा टोला माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी लगावला.

माहिती देताना माजी मंत्री पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांनी गुरुवारी बीडमधील पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तब्बल ८ महिन्यांनंतर बीड जिल्ह्यात आलेल्या पंकजा मुंडे यांचे जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.

हेही वाचा - 'मुलगी म्हणून मी सदैव त्यांच्या सोबतच, त्यांचा निर्णय माझ्यासाठी अंतिम'

पंकजा मुंडे म्हणाल्या, बळीराजाप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याला मदत करण्याची भूमिका सरकारने घेण्याची गरज आहे. पण ९९ टक्के भागात पंचनाम्याला लोक पोहचलेले नसल्याचे चित्र आहे. जिथे झालेत तिथे वरवरचे पंचनामे होत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांना सरसकट मदत झाली पाहिजे. विमा तर मिळावाच, पण भरघोस मदतही मिळाली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांच्यासोबत आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, गोविंद केंद्रे, अक्षय मुंदडा, रमेश पोकळे, भीमराव धोंडे, केशव आंधळे, मोहन जगताप, राम कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.

मी अजूनही लवादात -

ऊसतोड कामगारांचा संप सुरू आहे. मी अजूनही लवादात आहे. कामगारांच्या बाजूने आहे आणि लवकरात-लवकर याचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. सगळ्यांचे ऐकून निर्णय घेऊ, पण निर्णय लवादाच घेणार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

ऊस उत्पादकांची कोंडी-

मी पाच वर्षे कधी निधीचे राजकारण केले नाही. कधी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले नाहीत. वैद्यनाथबद्दल सांगायचे तर चारपैकी तीन वर्षे कारखाना बंद राहिला आहे. अशा परिस्थितीत मी प्रयत्न करतेय. माझ्या परिसरात साडेचार लाख टन ऊस आहे. सरकारने थकबाकी हमी घेतली आहे. अशा परिस्थितीत कारखान्याच्या कर्जात अडचणी आणल्या जात आहेत. ही कारखान्याची नव्हे तर ऊस उत्पादकांची कोंडी आहे, असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

हेही वाचा - केवळ आणि केवळ फडणवीसांमुळेच भाजपातून बाहेर पडलो - एकनाथ खडसे

Last Updated : Oct 22, 2020, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.