बीड - नगरहून बीडला जात असलेल्या कार चालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी आष्टी तालुक्यातील बीड-नगर रोडवरील सांगवी पाटण येथे घडली. एकनाथ गोल्हार (वय 62 रा.कापशी) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
![बीड कारची दुचाकीला धडक न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-bid-02-apghatnews-7204030_06012021174154_0601f_1609935114_466.jpg)
हेही वाचा - आंतरजातीय विवाहाला कुटुंबाचा विरोध; पोलिसांच्या समुपदेशाने वधू-वर एकत्र
अधिक माहिती अशी
याबाबत अंभोरा पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कार चालक ( एम एच 06,ए एफ 2198) घेऊन नगरहून बीडला निघाला होता. बुधवारी दुपारच्या सुमारास कापशीहून धामणगाव येथे लग्न समारंभासाठी जात असलेल्या ( क्र.एमएच 16 एयु 3419) या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिल्याने यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर, दुचाकीवर असलेले सून आणि नातू गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक अपघात घडताच पळून गेला असून रात्री उशिरापर्यंत अंभोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा - ममुराबाद शिवारात बिबट्या आढळला मृतावस्थेत; हत्या केल्याचा वन्यप्रेमींना संशय