ETV Bharat / state

बीड : जमावाच्या मारहाणीत एकाचा मृत्यू; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळास भेट

author img

By

Published : Jul 13, 2020, 4:58 PM IST

सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरी करण्याकरता गावात आलेल्या तीन-चार जणांपैकी एकजण गावकऱ्यांच्या हाती लागला. यात जमलेल्या गावकऱ्यांनी या व्यक्तीस जबर मारहाण केली. दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत जमावाने मारलेल्या व्यक्तीला कडा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

जमावाच्या मारहाणीत एकजण ठार
जमावाच्या मारहाणीत एकजण ठार

बीड : चोरीच्या उद्देशाने आष्टी तालुक्यातील फत्तेवडगांवमध्ये तीन-चारजण आले होते. दरम्यान, त्यातील एकजण लोकांच्या हाती लागल्याने गावकऱ्यांनी त्याला जबर मारहाण केली. या घटनेत सदर व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. हमजा नारायण भोसले (वय 64)असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत आष्टी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे 3 च्या सुमारास तीन ते चार जण चोरी करण्याच्या उद्देशाने तालुक्यातील फत्तेवडगांव गावात आले होते. दरम्यान, गावकरी गस्त घालत असल्याने एकाने गावात फोन करून चोर आल्याची खबर दिली. गावकरी जमा झाले आणि या चार जणातील एकजण जमावाच्या हाती लागला. जमावाने त्याला बेदम मारून पोलिसांना कळविले. दरम्यान जमावाने मारलेल्या व्यक्तीला पोलिसांनी कडा येथील प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सदर मतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून दुपारी 3 पर्यंत शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपाधिक्षक विजय लगारे, पोलीस निरीक्षक माधव सुर्यवंशी, एपीआय रियाज शेख यांच्यासह आदिंनी भेट दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.