परळी - ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्यावतीने मंगळवारी येथील एलआयसीच्या कार्यालयासमोर कोरोना विषयक नियम पाळत एक दिवसीय संप पुकारण्यात आला. यावेळी मागण्यासंदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. बोओसी, रिनीवल कमिशन, मर्चंट पोर्टलच्या कामकाजावर एक दिवस परिणाम जाणवला. ऑल इंडिया लियाफी परळी शाखेच्यावतीने करण्यात आलेल्या एक दिवसीय आंदोलनास विमा प्रतिनिधींचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देशभर संपाचे आवाहन-
येथील राणी लक्ष्मीबाई टावर जवळ असलेल्या एलआयसीच्या सॅटेलाईट ब्रंच कार्यालयासमोर मंगळवारी सकाळी दहा वाजता विमा प्रतिनिधी जमले व त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला. या मागण्यांसाठी ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने देशभर संपाचे आवाहन करण्यात आले होते.
एलआयसी प्रशासनाचे घेतले लक्ष वेधून-
या देशव्यापी आवाहनास ऑल इंडिया लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया येथील शाखेच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला. व संघटनेचे सर्व सदस्य व विमा प्रतिनिधींनी संप पुकारून एलआयसी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. मंगळवारच्या संपात संघटनेचे सचिव श्रीराम इंगळे, उपाध्यक्ष बाळासाहेब दत्तात्रय मुंडे, सदस्य दत्ता वैजनाथ मुंडे व विमा प्रतिनिधी मुरलीधर नागरगोजे, पांडुरंग राठोड, बाबुराव शिंदे रमेश होळंबे, मनोहर कराड, दत्तात्रय दहिफळे, सूर्यकांत कांचनगिरे, रमेश मुंडे, उमेश टाले, नागेश स्वामी, हनुमंत गीते बाबुराव शिंदे, जनार्दन कराड, मोहन मुंडे, मुकुंद ताटे, शेख जफर दामोदर विटेकर, विष्णू कदम, युवराज आघाव, सुमित लाहोटी, सतीश राऊत ज्ञानेश्वर मस्के यांच्या सह इतर विमा प्रतिनिधी सहभागी झाले होते.
हेही वाचा- शरद पवारांचा अनिल देशमुखांना पाठीशी घालण्याचा डाव फसला - देवेंद्र फडणवीस