ETV Bharat / state

बीडमध्ये संदीप क्षीरसागर तर परळीत धनंजय मुंडे ठरले किंगमेकर - बीड जिल्हा बातमी

बीड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका गवते तर उपसभापतिपदी शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 10 पंचायत समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. पाटोदा पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी होणार आहे.

संदीप क्षीरसागर
संदीप क्षीरसागर
author img

By

Published : Dec 31, 2019, 8:13 AM IST

बीड - जिल्ह्यातील 11 पैकी 10 पंचायत समितीच्या सभापती पदांच्या निवडी सोमवारी पार पडल्या. यामध्ये बीड पंचायत समितीवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर परळी पंचायत समितीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाने आपली सत्ता कायम ठेवली आहे.

बीडमध्ये संदीप क्षीरसागर तर परळीत धनंजय मुंडे ठरले किंगमेकर

बीड पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका गवते तर उपसभापतिपदी शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 10 पंचायत समित्यांचे सभापती निवडले गेले आहेत. पाटोदा पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी होणार आहे.

हेही वाचा - बीडमध्ये खासगी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप

परळी पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला शशिकांत गीते या सभापती तर उपसभापतिपदी बालाजी मुंडे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे सभापती व उपसभापती पदासाठी परळीत एकही अर्ज विरोधकांकडून दाखल न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वरील दोन्ही सभापती व उपसभापती घोषित करण्यात आले आहेत. एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या गटाने परळी पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले असून एकूण 12 पंचायत समिती सदस्यापैकी 8 पंचायत समिती सदस्य धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत तर 4 पंकजा मुंडे यांच्या गटाचे पंचायत समिती सदस्य आहेत.

गेवराई पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे पूर्वी शिवसेनेचे गेवराई पंचायत समितीवर वर्चस्व होते. भाजपच्या कल्पना सुरवसे या सभापती तर संदीप लगड हे उपसभापती झाले आहेत.

हेही वाचा - आमदार प्रकाश सोळंके राजीनाम्याच्या तयारीत; मंत्रिपद डावलल्याने नाराजी कायम

आष्टी पंचायत समिती सभापती पद ओबीसी महिलेसाठी राखीव होते. सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आला होता. परिणामी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या गटाच्या माधुरी जगताप यांची आष्टी पंचायत समितीच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे. तर उपसभापतीदी गणेश तांदळे यांची वर्णी लागली आहे.

अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या विजयमाला जगताप यांची बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीच्या आलिशान पटेल यांची उपसभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिले. तर शिरूर कासार पंचायत समितीच्या सभापतीपदी उषा विजय सरवदे यांची निवड झाली.

  • 'पाटोदा'ची निवड प्रक्रिया अचानक झाली रद्द-

पाटोदा पंचायत समिती निवडप्रक्रियेपूर्वी इच्छुक उमेदवारांनी पंचायत समितीत येऊन आपल्या नावांचा अर्ज दाखल करणे आवश्यक होते. दुपारी बारापर्यंतची वेळ नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दिली होती. मात्र, 12 वाजेपर्यंत कोणीच न आल्याने 12 वाजून 5 मिनिटांनी निवड निर्णय अधिकाऱ्यांनी सभापती निवड प्रक्रिया 1 दिवसाने पुढे ढकलली. म्हणजेच मंगळवारी 31 डिसेंबरला पाटोदा येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडण्यात येणार आहे.

केज पंचायत समिती भाजपच्या ताब्यात कायम आहे. येथे ओबीसीच्या परीमळा विश्वनाथ घुले या सभापती तर उपसभापती म्हणून ऋषिकेश आडसकर यांची निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीत एकूण 12 पंचायत समिती सदस्य आहेत. यापैकी 7 भाजपकडे तर 5 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वात छोटी पंचायत समिती असलेली वडवणी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अंजना बळीराम आजबे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती झाल्या आहेत. तर उपसभापती श्रद्धा सुमित उजगरे या झाल्या आहेत. एकूण 4 पंचायत समिती सदस्यांची वडवणी पंचायत समिती आहे. यामध्ये 3 राष्ट्रवादी काँग्रेसचे तरी 1 भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सदस्य आहे.

माजलगाव पंचायत समिती सभापती पद बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे. एकूण 12 पंचायत समिती सदस्यांची माजलगाव पंचायत समिती आहे. येथील सभापती ओबीसी महिला सोनाली खुळे तर उपसभापती डॉ. वसीम मनसुभदार हे झाले आहेत.

Intro:बीडमध्ये संदीप शिरसागर तळ परळीत धनंजय मुंडे ठरले किंगमेकर

बीड- जिल्ह्यातील 11 पैकी 10 पंचायत समितीच्या सभापती पदांच्या निवडी सोमवारी पार पडल्या, यामध्ये बीड पंचायत समितीवर आ. संदीप क्षीरसागर यांनी वर्चस्व प्रस्थापीत केले तर परळी पंचायत समितीवर मंत्री धनंजय मुंडे यांच्या गटाने आपली सत्ता कायम ठेवली. बीड पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका गवते तर उपसभापती पदी शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 10 पंचायत समित्यांचे सभापती खालील प्रमाणे निवडले गेले आहेत. पाटोदा पंचायत समिती च्या सभापती पदाची निवड मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर रोजी होणार आहे.

Body:परळी पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे उर्मिला शशिकांत गीते या सभापती तर उपसभापती बालाजी मुंडे यांची वर्णी लागली आहे. विशेष म्हणजे सभापती व उपसभापती पदासाठी परळीत एकही अर्ज विरोधकांकडून दाखल न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वरील दोन्ही सभापती व उपसभापती घोषित करण्यात आले आहेत. एकंदरीत धनंजय मुंडे यांच्या गटाने परळी पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले असून एकूण 12 पंचायत समिती सदस्या पैकी आठ पंचायत समिती सदस्य धनंजय मुंडे यांच्या गटाचे आहेत तर चार पंकजा मुंडे यांच्या गटाचे पंचायत समिती सदस्य आहेत.

गेवराई पंचायत समिती भाजपच्या ताब्यात गेली आहे पूर्वी शिवसेनेचे गेवराई पंचायत समितीवर वर्चस्व होते. भाजपच्या कल्पना सुरवसे या सभापती तर संदीप लगड हे उपसभापती झाले आहेत.

आष्टी पंचायत समिती सभापती पदे ओबीसी महिलेसाठी राख होते सभापतीपदासाठी एकमेव अर्ज आला होता परिणामी भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या गटाच्या माधुरी जगताप यांची आष्टी पंचायत समितीच्या सभापती पदावर बिनविरोध निवड झाली आहे तर उपसभापतीदी गणेश तांदळे यांची वर्णी लागली आहे.

अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या विजयमाला जगताप यांची बिनविरोध निवड झाली. तर राष्ट्रवादीच्या आलिशान पटेल हे उपसभापती म्हणून बिनविरोध निवडले गेले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी काम पाहिले.
शिरूर कासार पंचायत समितीच्या सभापतीपदी उषा विजय सरवदे यांची निवड झाली.

पाटोदा ची निवड प्रक्रिया अचानक झाली रद्द-

पाटोदा पंचायत समिती निवड प्रक्रिये पूर्वी इच्छुक उमेदवारांनी पंचायत समितीत येऊन आपल्या नावांचा अर्ज दाखल करणे आवश्यक होता. दुपारी बारापर्यंत ची वेळ नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी दिली होती. मात्र बारा वाजेपर्यंत कोणीच न आल्याने बारा वाजून पाच मिनिटांनी निवड निर्णय अधिकाऱ्यांनी सभापती निवड प्रक्रिया एक दिवसाने पुढे ढकलली. म्हणजेच मंगळवारी 31 डिसेंबर रोजी पाटोदा येथील पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडण्यात येणार आहे.

Conclusion:केज पंचायत समिती भाजपच्या ताब्यात कायम आहे. येथे ओबीसीच्या परीमळा विश्वनाथ घुले या सभापती तर उपसभापती म्हणून ऋषिकेश आडसकर यांची निवड करण्यात आली आहे. पंचायत समितीत एकूण 12 पंचायत समिती सदस्य आहेत. यापैकी 7 बीजेपी कडे तर 5 राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत.

बीड जिल्ह्यातील सर्वात छोटी पंचायत समिती असलेली वडवणी पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अंजना बळीराम आजबे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती झाल्या आहेत. तर उपसभापती श्रद्धा सुमित उजगरे या झाल्या आहेत. एकूण चार पंचायत समिती सदस्यांची वडवणी पंचायत समिती आहे. यामध्ये तीन राष्ट्रवादी काँग्रेसचे तरी एक भारतीय जनता पार्टीचा पंचायत समिती सदस्य आहे.

माजलगाव पंचायत समिती सभापती पद बिनविरोध बिनविरोध राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिले आहे. एकूण 12 पंचायत समिती सदस्यांची माजलगाव पंचायत समिती आहे. येथील सभापती ओबीसी महिला सोनाली खुळे तर उपसभापती डॉ. वसीम मनसुभदार हे झाले आहेत.
*********

बातमी सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस चे आमदार संदीप क्षीरसागर यांचा बाईट व व्हिज्युअल पाठवत आहे...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.