बीड - जिल्ह्यात सोमवारी 111 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 63 हून अधिक ग्रामपंचायतीवर दावा केला आहे. उर्वरित 48 ग्रामपंचायतीमध्ये भाजपा-शिवसेना तसेच अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. भाजपाला बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मात्र चांगले यश मिळाले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील अकरापैकी 10 ग्रामपंचायतीवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी दावा केला आहे. या उलट बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात दोन ग्रामपंचायतींची मतमोजणी होती. या दोन्ही ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला दावा केला असून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या वडवणीमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
ग्रामपंचायत निवडणूक : बीड जिल्ह्यात 111 पैकी 65 हून अधिक जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा - beed district gram panchayat election 2021 results
बीड जिल्ह्यात सोमवारी 111 ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जवळपास 63 हून अधिक ग्रामपंचायतीवर दावा केला आहे.