ETV Bharat / state

न्यायालयीन लढ्यात राष्ट्रवादीला यश; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या शिरसाठ, तर उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे - shivkanya shirsath beed

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवले होते. त्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे बंद पाकीट उघड करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले.

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी जाहीर
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी जाहीर
author img

By

Published : Jan 13, 2020, 11:23 PM IST

बीड - जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी ४ जानेवारीला झालेल्या मतदानानंतर पाच सदस्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशाने अखेर राखीव निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ तर, उपाध्यक्षपदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड आज( 13 जानेवारी) जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवले होते. त्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे बंद पाकीट उघड करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या ५ सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष-उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात, या निकषावर न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले.

आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व सहकाऱ्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी व न्यायालयाने दिलेला निकाल पाहता या लढ्याला यश आल्याचे निदर्शनास येते.

हेही वाचा - ..अन् पुन्हा दिसून आला धनंजय मुंडेंचा संवेदनशीलपणा

मतदान करण्याचे अधिकार गोठवलेल्या पाच सदस्यांच्या रिट याचिकेला उच्च न्यायालयाने दाखल करून घेत लवकरात लवकर सुनावणी होईल, असे आश्वासन त्यांना दिले आहे. परंतु, महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जुळवलेले संख्याबळ पाहता अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या आज घोषित करण्यात आलेल्या निवडी कायम राहतील असेच दिसते. दरम्यान, बीडच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ ह्या येत्या दोन दिवसात अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारतील. तर, उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सोमवारीच पदभार स्वीकारला आहे.

Intro:न्यायालयीन लढ्याला राष्ट्रवादीला यश, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष - उपाध्यक्ष निवडी जाहीर

बीड- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ४ जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर त्या पाच सदस्यांच्या मुद्द्यावरून राखीव ठेवलेला निकाल सोमवारी उच्च न्यायालयाच्या आदेशाने जाहीर करण्यात आला. अध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवकन्या शिवाजी शिरसाठ तर उपाध्यक्ष पदी बजरंग सोनवणे यांची अधिकृत निवड आज जाहीर करण्यात आली.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपात डेरेदाखल झालेल्या पाच सदस्यांचे मतदानाचे अधिकार गोठवलेले असल्यामुळे ४ जानेवारीला झालेल्या निवडीनंतर तो निकाल बंद पाकिटात ठेवण्यात यावा व आज दि. १३ रोजी न्यायालयाच्या समोर तो उघड करण्यात यावा असे आदेश दिले होते. त्यानंतर आज उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान निकालाचे ते बंद पाकीट उघड करण्यात आले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेस आघाडीच्या बाजूने ३२ तर भाजपच्या बाजूने २१ मते असल्याचे निष्पन्न झाले. मतदानाचा अधिकार गोठवलेल्या त्या ५ सदस्यांचा विचार केला तरीही अध्यक्ष उपाध्यक्ष हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच विजयी ठरतात या निकषावर न्यायालयाने निकाल जाहीर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे व सहकाऱ्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोडी व न्यायालयाने दिलेला निकाल पाहता धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील या लढ्याला यश आले असेच म्हणावे लागेल.

दरम्यान त्या पाच सदस्यांचे मतदान करण्याचे अधिकार गोठवलेले असले तरी त्यांच्या रिट याचिकेला उच्च न्यायालयाने दाखल करून घेत लवकरात लवकर त्याबाबतही सुनावणी होईल असे म्हटले आहे. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने जुळवलेले संख्याबळ पाहता अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या आज घोषित करण्यात आलेल्या निवडी कायम राहतील असेच दिसते.

दरम्यान बीडच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाठ ह्या येत्या दोन दिवसात अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारणार असून उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी सोमवारीच पदभार स्वीकारला आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.