बीड - कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता इतर कुठल्याही सुविधांची दुकाने सुरू नाहीत. याकाळात सलूनही बंद आहेत यामुळे आमदार नमिता मुंदडा यांनी आपले पती अक्षय मुंदडा यांच्या हेअर कटींगचा प्रश्न सोडवला. चक्क आमदारांनी त्यांचे पती अक्षय मुंदडा यांची हेअर कटिंग केली आहे. केस कापल्यानंतर स्वतः अक्षय मुंदडा यांनी फेसबुक वर पोस्ट करत म्हटले आहे की, हे लॉकडाऊन माझ्या कायम आठवणीत राहील. बायकोने आज माझा परफेक्ट हेअर कट केला आहे, अशी पोस्ट केली याची जिल्ह्यात सर्वत्र चर्चा झाली.
कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे सर्वत्र लॉकडाऊन केलेले आहे. या परिस्थितीत जिल्ह्यातील हेअर सलून बंद आहेत. तीन मे पर्यंत सलून उघडण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी स्वतः कात्री हातात घेत पती अक्षय मुंदडा यांच्या हेअर कटींगचा प्रश्न सोडवला आहे.
केस कापल्यानंतर ‘लॉकडाऊनचा असाही एक फायदा जो माझ्या कायम आठवणीत राहील ! बायको ने आज माझा परफेक्ट हेअरकट केला’, अशी पोस्ट कटींगच्या फोटोसह अक्षय मुंदडा यांनी फेसबुकवर टाकली आहे. ती पोस्ट नमिता मुंदडा यांनीही शेअर केली.