बीड - कोणत्याही कारवाईशिवाय वाळूचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नायब तहसीलदाराला, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. प्रल्हाद लोखंडे असे या अटक केलेल्या नायब तहसिलदाराचे नाव असून बीड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी बुधवारी गेवराई येथे ही कारवाई केली.
हेही वाचा... नागपूर विभागात गेल्या 5 वर्षात 1,592 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 617 आत्महत्या मदतीसाठी अपात्र
गेवराई तहसील कार्यालयात दोन दिवसांपूर्वी एक वाळूने भरलेला ट्रक पकडला होता. हा ट्रक कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यासाठी प्रल्हाद लोखंडे या तहसीलदाराने तक्रारदाराला एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून प्रल्हाद लोखंडे याला बुधवारी रंगेहात पकडले. अटकेनंतर पुढील कारवाई सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख बाळकृष्ण हनपुडे पाटील यांनी सांगितले आहे.
हेही वाचा... ' लोकांना अलंकारिक अथवा अपशब्द नव्हे, अर्थव्यवस्थेची वस्तुस्थिती ऐकायची आहे '
बीड जिल्ह्यात आज घडीला एकही वाळू पट्ट्याचा लिलाव झालेला नाही. असे असतानाही वाळू वाहतूक सुरू आहे. या सगळ्या प्रकाराला प्रशासनातील काही अधिकारी उघडपणे साथ देत आहेत. अशाच प्रकारात प्रल्हाद लोखंडे हा नायब तहसीलदाराल लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला.