ETV Bharat / state

बीड : दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या; विहिरीत उडी घेत संपवले जीवन - Mother commits suicide with daughter kej taluka beed

शितल जाधवर या पुणे येथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती राजाभाऊ जाधवर यांना सहा महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यानंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी राहत होती. त्यामुळे कोरोनानंतरही चार महिने त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. त्यानंतर त्यांना घरी शिफ्ट केले. घरी शिफ्ट केल्यानंतर ऑक्सिजन काढण्यात आला.

Mother commits suicide with one and a half year old daughter
दीड वर्षाच्या चिमुकलीसह आईची आत्महत्या
author img

By

Published : Sep 17, 2021, 6:17 PM IST

बीड - दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना गुरूवारी रात्री केज तालुक्यातील बानेगाव येथे घडली.

केज तालुक्यातील बानेगाव माहेर असणाऱ्या आशाचा विवाह सुंदर जाधवर (रा.वडजी, ता.वाशी) यांच्याशी तीन वर्षापूर्वी झाला होता. सुंदर आणि आशा दोघेही शिक्षक होते. ते वास्तव्यास पुण्यामध्ये होते. वर्षभरापूर्वी सुंदर जाधवर यांना कोरोनाची लागण झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पतीच्या निधनाने नैराश्यात असलेल्या आशा जाधवर दोन दिवसांपूर्वी आपल्या दीड वर्षाच्या शांभवी या मुलीसह माहेरी बानेगावला आल्या होत्या. गुरूवारी वडील बाहेरगावी गेले होते आणि आई शेतीच्या कामात गुंतली होती. सायंकाळच्या सुमारास आशा जाधवर यांनी मुलगी शांभवीला शेतात नेले. यानंतर विहिरीत उडी घेत आत्महत्या केली.

मृत्यूचे कारण -

शितल जाधवर या पुणे येथे प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्यांचे पती राजाभाऊ जाधवर यांना सहा महिन्यापूर्वी कोरोना झाला होता. त्यानंतर कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी राहत होती. त्यामुळे कोरोनानंतरही चार महिने त्यांना ऑक्सिजन पुरवण्यात आला. त्यानंतर त्यांना घरी शिफ्ट केले. घरी शिफ्ट केल्यानंतर ऑक्सिजन काढण्यात आला. मात्र, स्कोर कमी जास्त होत असे. यातच त्यांचा मागील महिन्यात मृत्यू झाला. राजाभाऊ जाधवर हे मूळचे वडजी ता. वाशी जि. उस्मनाबाद येथील होते. तेही पुणे येथे माध्यमिक शाळेत शिक्षक होते. सहा दिवसापूर्वी त्यांचे पहिले मासिक मुळगाव वडजी येथे झाले होते. त्यानंतर शितल जाधवर आपल्या माहेरी बाणेगाव येथे गेल्या होत्या. त्यांचे पतीवर अतिशय प्रेम होते. पतीच्या निधनानंतर त्यांचा विरह सहन न होऊन त्यांनी काल आपल्या लहान मुलीला आपल्या पोटाशी ओढणीने घट्ट बांधले व विहिरीत उडी मारली. विहिरीत गाळ असल्यामुळे त्या गाळात अडकून राहिल्या व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अथक परिश्रमा नंतर रात्री बारा वाजता त्यांचे प्रेत काढण्यात या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - बेधडक नितीन गडकरी : पत्नीला न सांगताच 'सासऱ्या'च्या घरावर चालवला होता 'बुलडोझर'!!

घटनेची माहिती मिळताच, ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांनी विहिरीकडे धाव घेतली. पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. गुरूवारी रात्री उशिरा मायलेकींचे मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आले. त्यांचे शवविच्छेदन करून शुक्रवारी सकाळी शोकाकुल वातावरणात दोघींवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.