ETV Bharat / state

MNS Beed : केंद्र सरकारला शिवस्मारकाची आठवण? मनसेचे अनोखे आंदोलन

author img

By

Published : Dec 24, 2022, 8:12 PM IST

केंद्र सरकारला शिवस्मारकाची आठवण करून देण्यासाठी ( remind to central government of Shiv Smarak ) बीडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन ( MNS workers protest ) केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अपुर्ण असल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळेच भाजप सरकारला त्याची आठवण व्हावी, यासाठी मनसेने शहरभरात बॅनरबाजी निषेध केला आहे.

शिवस्मारक
शिवस्मारक
शिवस्मारकाची आठवणीसाठी बीडमध्ये मनसे कार्यकर्त्यांचे अनोखे आंदोलन

बीड : बीडच्या गेवराई शहरात मनसेच्यावतीने अनोखी बॅनरबाजी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ( Shiv Smarak ) अपुर्ण असल्याने शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या जात असल्याचे मत मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. सहा वर्षे उलटली मात्र तरी देखील इथे एकही वीट रचली गेलेली नाही. आणि त्यामुळेच भाजप सरकारला त्याची आठवण व्हावी यासाठी मनसेने शहरभरात बॅनरबाजी करून काळा निषेधाचा केक कापला आहे.

छत्रपतींच्या स्मारकाचा सरकारला विसर? : 24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांनी अरबी समुद्रात शिवस्मारकासाठी भूमिपूजन केले होते. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आधारासह एकूण उंची २१२ मीटर असणार आहे. चीनमधील २०८ मीटर उंचीच्या स्प्रिंग टेंपल बुद्धापेक्षा याची उंची वाढवण्यात आली आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी सर्व थिएटर असणार आहे.

स्मारक समितीचा दावा खोटा? : संपूर्ण 3600 कोटी किंमतीच्या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा सुमारे 2600 कोटी रुपयांचा असणार आहे. पहिल्या टप्प्यात पुतळा, जेट्टी, हेलिपॅड, स्मारकाची तटबंदी, तुळजाभवानी मंदिर, रेस्टोरंट, हॉस्पिटल अशी प्रमुख कामे केली जाणार आहेत. पहिला टप्पा फेब्रुवारी 2019 पर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचा दावा स्मारक समितीने केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.