ETV Bharat / state

Raj Thackeray Warrant एसटीवर दगडफेक प्रकरण राज ठाकरे उद्या परळी न्यायालयात लावणार हजेरी - परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा

परप्रांतीय तरुणांना रेल्वेत नोकरी न देता स्थानिक तरुणांना नोकरीत प्राधान्य देण्यात यावे, यासाठी राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी आंदोलन केले होते. मात्र त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेच्या विरोधात परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एसटी बसवर दगडफेक ( Stone Pelting On ST Bus Case ) केली होती. याप्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यात राज ठाकरे यांच्याविरोधात परळी न्यायालयाने अजामीनपात्र अटक ( Raj Thackeray Non bailable warrant ) वारंट बजावले आहे.

MNS Chief Raj Thackeray
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Jan 2, 2023, 12:36 PM IST

बीड - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांना २२ ऑक्टोबर २००८ रोजी अटक झाल्यानंतर निषेध नोंदवत परळीतील पदाधिकाऱ्यांनी परळी-गंगाखेड रोडवरील धर्मापुरी फाटा येथे एसटीवर दगडफेक ( Stone Pelting On ST Bus Case ) केली होती. याप्रकरणी राज ठाकरे ( Raj Thackeray Non bailable warrant ) यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांवर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट रद्द करून जामीन मिळवण्यासाठी राज ठाकरे ( Raj Thackeray Will Appear In Parli Court Tomorrow ) उद्या परळीत येणार आहेत.

परळी न्यायालयात दोषारोपपत्र एसटी बसवर दगडफेक प्रकरणी पोलिसांनी राज ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध परळी न्यायालयात दोषारोपपत्र ( Charge sheet Against Raj Thackeray ) दाखल केले होते. राज ठाकरे व मनसे कार्यकर्ते न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध ६ जानेवारी २०२२ रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करत १० फेब्रुवारी २०२२ पर्यंत परळी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकरणातील मनसेचे तत्कालीन पदाधिकारी संजय अघाव, प्रल्हाद सुरवसे, अनीस बेग, शिवदास बिडगर, राम लटपटे या पाच जणांनी न्यायालयात ( Stone Pelting On ST Bus ) हजर होऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द केले. परंतु राज ठाकरे ( Raj Thackeray Will Appear In Parali Court Tomorrow ) यांच्याविरुद्ध १३ एप्रिल रोजी दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.